घरक्रीडाIND vs AUS : स्वतःच्या कामगिरीवर खुश! मोहम्मद सिराजने केली 'ही' लक्झरी...

IND vs AUS : स्वतःच्या कामगिरीवर खुश! मोहम्मद सिराजने केली ‘ही’ लक्झरी कार खरेदी

Subscribe

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिराजने तीन सामन्यांत १३ विकेट घेतल्या.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका २-१ अशी जिंकला. या मालिका विजयासह भारताने सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखला. भारताच्या या यशात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने महत्वाची भूमिका बजावली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिराजने तीन सामन्यांत १३ विकेट घेतल्या. या मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर राहिला. तो या कामगिरीवर खुश असून त्याने स्वतःला नवी ‘बीएमडब्ल्यू’ कार गिफ्ट केली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर या लक्झरी कारचा फोटो शेअर केला.

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कामगिरीनानंतर भारताचे खेळाडू गुरुवारी मायदेशी परतले. सिराज भारतात परतल्यावर घरी न जाता, एअरपोर्टहून थेट दफनभूमीत गेला. तिथे जाऊन त्याने वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले. सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचे २० डिसेंबरला निधन झाले. मात्र, क्वारंटाईनच्या नियमांमुळे सिराजने मायदेशात न परतण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -