Video: RJ मलिष्काने नीरजकडे मागितली जादू की झप्पी, तर नीरज म्हणाला…

Video: RJ मलिष्काने नीरजकडे मागितली जादू की झप्पी, तर नीरज म्हणाला…

Video: RJ मलिष्काने नीरजकडे मागितली जादू की झप्पी, तर नीरज म्हणाला...

मुंबईची राणी आरजे मलिष्का नेहमी चर्चेत असते. समाजातील घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ती आपल्या अंदाजात भाष्य करत असते. सध्या मलिष्का टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या घेतलेल्या मुलाखतीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नेटकरी तिला ट्रोल करत असून अनेक जण तिच्यावर टीका करत आहेत. तसेच मलिष्काचे नीरज चोप्रासोबतच्या मुलाखतीमधले व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहे. पण आरजे मलिष्काला ट्रोल करण्याचं नेमकं कारण काय आहे? ते वाचा

सध्या सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा सतत टीव्ही चॅनल, रेडिओ आणि वर्तमानपत्रांमध्ये मुलाखत देताना दिसत आहे. त्याचप्रमाणे काल, शुक्रवारी नीरज चोप्राने रेडिओ चॅनल ९३.५ एफएमला झूमद्वारे मुलाखत दिली. आरजे मलिष्काने नीरजची मुलाखत घेतली. यावेळी मलिष्का आणि तिच्या सहकाऱ्यांनी नीरज समोर ‘उडे जबजब जुलफे तेरी’ या गाण्यावर डान्स केला. तसेच यावेळी मलिष्काने नीरजकडे जादू की झप्पी मागितली आणि त्याने लांबूनच नमस्ते असं हसून तो म्हणाला. सध्या हे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल असून मलिष्काला यामुळे ट्रोल केलं जात आहे.

मलिष्काच्या व्हिडिओवर नेटकरी काय म्हणाले?

मलिष्काच्या या मुलाखतीवर खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जात आहे. एक नेटकरी म्हणाला की, ‘सुवर्ण पदक विजेत्याला कोणत्या मुर्खपणातून जावं लागतंय.’ तर दुसरा म्हणाला, ‘या झूमद्वारे नीरजला भालाफेकण्याची इच्छा होत असेल, पण आपली एवढी चांगली टेक्नॉलॉजी नसल्याने त्याला हे करता आलं नाही.’ तिसरा नेटकरी म्हणाला की, ‘यामुळेच चिडचिड होते.’ तर चौथा म्हणाला की, ‘हा केवळ डान्स नसून एक प्रकारे लैंगिकता म्हणून तिरस्कार झाला आहे.’


हेही वाचा – काबुलमध्ये विमानातून पडल्याने अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचा मृत्यू


 

First Published on: August 21, 2021 10:42 AM
Exit mobile version