Mumbai Indians: सलग ८ सामने गमावल्याने रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद

Mumbai Indians: सलग ८ सामने गमावल्याने रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे सलग ८ सामने गमावल्याने एका नव्या विक्रमाची नोंद झालेली आहे. केएल राहुलच्या नावे १०३ धावांच्या खेळीमुळे लखनऊ सुपर जायंट्सने २४ एप्रिलला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ च्या सीझनमध्ये एमआय पलटनने सलग आठवा सामना गमावला आहे. कोणत्याही सीझनमध्ये लागोपाठ ८ सामने गमावणाऱ्या संघाचा कर्णधार झाल्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे झाला आहे. रोहित शर्माने बाबर आजमच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याचा रेकॉर्ड हा कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे वॉरियर्स इंडियाच्या नावे आहे. पुण्याच्या संघाने दोनवेळा हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. आयपीएल २०१२ आणि २०१३ मध्ये लागोपाठ ९ सामने गमावल्याचा लागोपाठ दोन वर्षाचा रेकॉर्ड या संघाच्या नावे आहे. तर शाहरूख खानच्या मालकीची कोलकाता नाईट रायडर्सने २००९ च्या आयपीएलमध्ये लागोपाठ ९ सामने गमावले होते.

बाबर आजमने कराची किंग्जच्या पाकिस्तान सुपर लीग २०२२ मध्ये लागोपाठ ८ सामने गमावल्याचा रेकॉर्ड केला आहे. तर पीएसएलने सुरूवातीचे सात सामने गमावण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्यापाठोपाठ आता रोहित शर्मानेही हा रेकॉर्ड केला आहे. रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व आहे. तर पाकिस्तानच्या संघाची धुरा बाबर आजमकडे आहे हे विशेष.


 

First Published on: April 25, 2022 6:33 PM
Exit mobile version