Khel Ratna Award: रोहित शर्मासह ‘या’ चौघांना मिळणार ‘खेलरत्न’ पुरस्कार

Khel Ratna Award: रोहित शर्मासह ‘या’ चौघांना मिळणार ‘खेलरत्न’ पुरस्कार

रोहित शर्मा

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर मोहर उमटवत टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्याप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याच्यासह चौघांना ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळणार आहे. याच्यासह महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू मरियप्पन थंगवेलू आणि भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना यंदाचा ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा प्रथमच राष्ट्रपती भवनात २९ ऑगस्ट रोजी आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.

मानाचा पुरस्कार मिळवणारा चौथा क्रिकेटपटू

रोहित शर्माची खेलरत्नसाठी निवड झाल्यामुळे मानाचा पुरस्कार मिळवणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता. २०१९ विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतके झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचे नाव खेलरत्नसाठी दिले होते.


हेही वाचा – भारतीय क्रिकेट संघाचा आणखी एक खेळाडू अडकणार लग्नबंधनात


First Published on: August 21, 2020 7:23 PM
Exit mobile version