…म्हणून सचिनच्या जागी गांगुलीला कर्णधार बनवलं

…म्हणून सचिनच्या जागी गांगुलीला कर्णधार बनवलं

सचिन तेंडुलकर हा जगातील एक महान फलंदाज होता, परंतु कर्णधार म्हणून तो नेहमीच अपयशी ठरला आहे. सचिन तेंडुलकरने १९९६ ते २००० या काळात टीम इंडियाचा कर्णधारपद सांभाळलं होतं. सचिन तेंडुलकरने ९८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं, त्यापैकी टीम इंडियाने २७ सामने जिंकले आणि ५२ सामने गमावले. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताने ७३ एकदिवसीय सामन्यांपैकी २३ सामने जिंकले. तर कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने सचिनच्या नेतृत्वात २५ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकले.

टीम इंडियाचे माजी मुख्य निवडक चंदू बोर्डे यांनी खुलासा केला आहे की सचिन तेंडुलकरने मला येऊन सांगितलं की, मला कर्णधारपदावरून काढून टाका. सचिन तेंडुलकरला टीम इंडियाच्या नेतृत्वात रस नव्हता. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं आहे, अशी सचिनची इच्छा होती, असं चंदू बोर्डे म्हणाले. माजी मुख्य निवडकर्ते चंदू बोर्डे यांनी स्पोर्ट्सकिडाला सांगितलं की, “सचिन स्वत: आला आणि म्हणाला की त्याला कर्णधारपदावरून काढून टाकलं पाहिजे. आम्ही त्याला ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेसाठी कर्णधार म्हणून पाठवलं होतं. सचिन परतल्यावर त्याला कर्णधारपदाची इच्छा नव्हती.”


हेही वाचा – टी-२० वर्ल्डकप लांबणीवर पडल्यास यंदा आयपीएलमध्ये खेळण्याची खात्री!


चंदू बोर्डे यांनी सांगितलं की, “मला माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं आहे, असं सचिनने सांगितलं. त्यानंतर मी त्याला सांगितलं की तु काही काळ कर्णधार रहा कारण आम्हाला नवीन कर्णधार शोधावा लागेल.” चंदू बोर्डे म्हणाले, “मला सचिनला कर्णधार ठेवायचं होतं, आम्ही भविष्याकडे पाहत होतो, पण त्यानंतर सचिनने वारंवार नकार दिल्यानंतर निवड समितीने गांगुलीला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलं.”

 

First Published on: June 22, 2020 3:37 PM
Exit mobile version