गुड मॉर्निंग बाद फेरीत

गुड मॉर्निंग बाद फेरीत

गुड मॉर्निंग, बंड्या मारुती, उत्कर्ष, स्वस्तिक यांसारख्या संघांना शिवशंकर उत्सव मंडळ आयोजित राज्यस्तरीय प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यात यश आले. श्रमिक जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यात गुड मॉर्निंग क्लबने सत्यम संघाचा ४१-४० असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. गुड मॉर्निंगच्या विजयात प्रफुल कदम आणि स्वप्निल भादवनकर हे खेळाडू चमकले.

दुसरीकडे शिवशंकर मंडळाने उजालावर ४०-३३ अशी मात केली. शिवशंकरच्या मंगेश सोनवणेने, तर उजालाच्या रोहित नाईक आणि सुमित पाटील यांनी चांगला खेळ केला. विजय क्लबने जैद कवटेकर, शुभम वर्माच्या दमदार खेळाच्या जोरावर मोरयाचा ३१-२१ असा पराभव केला. जय भारत क्रीडा मंडळाने पालघरच्या श्रीराम क्रीडा मंडळाचा ३३-२१ असा धुव्वा उडवला. जय भारतच्या विजयात सागर काविटकर, सिद्धेश सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

इतर निकाल : केदारनाथ मंडळ विजयी वि. सुनील स्पोर्ट्स क्लब (३५-२८), जय भारत मंडळ विजयी वि. उत्कर्ष मंडळ (३३-२०), विजय नवनाथ विजयी वि. विजय बजरंग (२३-१८).

First Published on: February 29, 2020 2:11 AM
Exit mobile version