भारतीय संघात गोंधळ..,भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरची प्रतिक्रिया

भारतीय संघात गोंधळ..,भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरची प्रतिक्रिया

पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया चषक सुपर-4 च्या सामन्यात भारतीय संघाचा 5 गडी राखून पराभव केला आहे. पहिल्या संघात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा वचपा काढला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात रोमांच शिगेला पोहोचला होता, मात्र यावेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं तुटली.

भारतीय संघाच्या या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ भारतीय संघाला पराभूत करेल. हे मला माहित होते. पहिल्या सामन्यातील विजयाचा आनंद जास्त साजरा करू नका, असे त्याने आपल्या भारतीय मित्रांना सांगितले होते, असा खुलासाही अख्तरने केला.

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, मी माझ्या भारतीय मित्रांना तसेच इतर अनेक मित्रांना सांगितले होते की इतकं आनंदी होण्याची गरज नाही. पाकिस्तान पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये पुनरागमन करेल. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनच्या निवडीबद्दल मला आश्चर्य वाटले. त्याने भारतीय संघ व्यवस्थापनाला सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडण्यास सांगितले. तुमची प्लेइंग इलेव्हन कोणती असावी हे भारताने ठरवावे. भारतीय संघात एवढा गोंधळ का आहे ते मला समजत नाहीये, असे शोएब अख्तर म्हणाला.

सुपर-4 सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 181 धावा केल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने हा सामना जिंकला. रिझवानच्या 71 धावांच्या खेळीने 19.5 ओव्हर्समध्ये 182 धावा करत पाकिस्तानने सामना जिंकला.


हेही वाचा : नंबर सगळ्यांकडे होता, पण धोनीनेच मेसेज केला; कर्णधारपद सोडल्यानंतरचा विराट कोहलीने सांगितला किस्सा


 

First Published on: September 5, 2022 8:02 PM
Exit mobile version