T20 WORLD CUP : शोएब अख्तरचा संताप

T20 WORLD CUP : शोएब अख्तरचा संताप

T20 WORLD CUP : शोएब अख्तरचा संताप

पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी टी -२० विश्वचषकाच्या एक महिन्यापूर्वीच आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी जाहीर केले की मिसबाह आणि वकार यांनी राजीनामा दिला आहे. तसेच पाकिस्तानचा माजी कसोटी खेळाडू सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रज्जाक हे सध्याचे अंतरिम प्रशिक्षक म्हणुन असतील. हा अचानक बदल १३ सप्टेंबर रोजी माजी कसोटी कर्णधार रमीझ राजांची पाकिस्तान बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्तीशी जोडला जात आहे. मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तान क्रिकेटबाबत बरीच चर्चा सुरु आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अख्तरने मिसबाह आणि वकार युनूस यांनी विश्वचषकापूर्वी राजीनामा दिलेल्याने त्यास मूर्खपणा असल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांनी जे केले ते चुकीचे असल्याचे अख्तर म्हणाला. विश्वचषकासाठी २० ते २५ दिवस शिल्लक आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला. तुमचे कृत्य ‘पळकुट्या’ सारखे आहे. तुम्हाला भीती होती की रमीज राजा तुम्हाला सोडणार नाहीत, ज्यामुळे तुम्ही अशा परिस्थितीत राजीनामा दिला. अख्तरने मिसबाह आणि युनूस यांच्या राजीनाम्याची तुलना तालिबानशी केली.

मिसबाह म्हणाला, “मला माझ्या कुटुंबापासून दूर जैव-सुरक्षित वातावरणात (बायो-बबल) मध्ये बराच वेळ घालवावा लागेल. हे लक्षात घेता मी या भूमिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वकार म्हणाला की, जेव्हा मिसबाहने आपला निर्णय आणि भविष्यातील योजना त्याच्यासोबत व्यत्क केल्या, तेव्हा त्यांच्यासाठी राजीनामा देणे हा एक सोपा निर्णय होता कारण दोघांनी एक जोडी म्हणून काम केले होते आणि आता ते संघातील त्यांच्या भूमिकांमधून बाहेर पडतील.

पीसीबीने सांगितले की, सकलेन आणि रज्जाक न्यूझीलंड मालिकेसाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून संघ व्यवस्थापनात सामील होतील. मिसबाह आणि वकार यांची नियुक्ती सप्टेंबर २०१९ मध्ये करण्यात आली होती आणि त्यांच्या करारात अजून एक वर्ष शिल्लक होते. न्यूझीलंडचा संघ ११ सप्टेंबर रोजी तीन एकदिवसीय आणि पाच टी -२० सामन्यांसाठी पाकिस्तानला पोहोचेल. या मालिकेसाठी, पाकिस्तान संघ ८ सप्टेंबर रोजी इस्लामाबादमध्ये एकत्र येईल.


हेही वाचा : FIFA WORLD CUP 2022 : क्वालिफायर सामन्यात अधिकाऱ्यांची धाव

ENG VS IND TEST SERIES : कोहली आणि रवी शास्त्रींवर बीसीसीआय संतापले

First Published on: September 7, 2021 6:39 PM
Exit mobile version