स्मृती मंधाना Cricketer of the Year !!

स्मृती मंधाना Cricketer of the Year !!

cricket opener smriti mandhana injured

भारताची महिला स्टार क्रिकेटर स्मृती मंधानाला आयसीसीचा Cricketer of the Year पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वयाच्या २२व्या वर्षीच स्मृतीचा Cricketer of the Year पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. १२ वन डे सामन्यांच्या मालिकेमध्ये स्मृती मंधानानं ६६.९०च्या सरासरीनं ६६९ धावा केल्या आहेत. तर, २५ टी-२० सामन्यांमध्ये स्मृतीनं १३०.६७च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. स्मृती ही सांगलीची रहिवासी देखील आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या लेकीचा झालेला हा सन्मान पाहून सर्वांचा ऊर आणखी भरून आला आहे. भारतीय महिला संघाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपल्या कामगिरीनं स्मृतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप देखील पाडली. अखेर त्याची दखल ICCनं घेत तिचा Cricketer of the Yearनं सन्मान केला आहे.

वाचा – बीसीसीआय २०१८च्या पुरस्कारांची यादी जाहीर

First Published on: December 31, 2018 6:22 PM
Exit mobile version