राष्ट्रीय क्रीडा दिवसाचा प्रसार होणे आवश्यक

राष्ट्रीय क्रीडा दिवसाचा प्रसार होणे आवश्यक

विजेते संघ

ध्यानचंद यांनी भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ अशा तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या या अप्रतिम कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला होता. तसेच भारत सरकारने २९ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा करायचे ठरवले.

अजूनही लोकांना ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ कधी हे ठाऊक नाही 

२९ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय खेळांचा अधिक प्रचार आणि प्रसार व्हावा हा या मागचा मुख्य उद्देश होता. पण अनेक लोकांना अजूनही या गोष्टीची माहिती नाही. या दिवशी विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यातच हॉकीचे सामने जरा जास्त प्रमाणात होतात. यावर्षीही अनेक राज्यांत हॉकीच्या स्पर्धा भरवल्या गेल्या. मात्र, ते सामने पाहायला कोणीही नव्हते.

लॉरेन्स बिंग यांची अनोखी संकल्पना

अनेक राज्यांत मोठया मुलांचे सामने होत असताना लॉरेन्स बिंग यांनी १० आणि १२ वर्षांखालील मुलांचे सामने भरवण्याचा निर्णय घेतला. हे सामने वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लास शाळेच्या मैदानात झाले. यामागे एकच उद्देश होता. तो म्हणजे २९ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा. लहान मुलांचे सामने घेतले की त्यांच्यासोबत त्यांचे पालकही येतात. तसेच लहान मुले आपल्या मित्रांना या गोष्टीविषयी सांगतात. त्यामुळे या दिवसाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते. मुख्य म्हणजे ‘ ग्रास रूट ‘ लेवलवर हा उपक्रम राबवल्याने लहान मुलांनाही या दिवसाचे महत्व कळण्यास मदत होते.
” सगळ्या राज्यात मोठ्या मुलांचे सामने होत असताना मी लहान मुलांचे सामने भरवण्याचे धाडस केले याचे कारण म्हणजे मला या दिवसाचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. आजही अनेक लोकांना २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो हे माहित नाही. ध्यानचंद यांच्या कार्याची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी.” –  लॉरेन्स बिंग, सचिव, मुंबई शाळा क्रीडा संघटना 
First Published on: August 30, 2018 6:50 PM
Exit mobile version