IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूने टाकला सर्वात वेगवान चेंडू

IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूने टाकला सर्वात वेगवान चेंडू

आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक उत्तम कामगिरी करत आहे. उमरान हा १५० च्या वेगाने गोलंदाजी करत आहे. उमरान आतापर्यंत एकून ७ सामने खेळला असून यामध्ये त्याने १० विकेट घेतल्या आहेत.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याच्या विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या उमरान मलिकने केला. उमरानने तब्बल ताशी १५४ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगानं भल्याभल्या फलंदाजांना थक्क केलं आहे. आयपीएलच्या या सीझन मधून फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ द मॅच अवॉर्ड देखील त्याला दिला जात आहे, जो उमरान मलिकने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात जिंकला आहे.

आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सच्या लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता, ज्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध १५३.९ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. पण आता उमरान मलिकने फर्ग्युसनला मागे टाकले आहे. उमरान मलिकने या मोसमात अनेकवेळा १५० किमी प्रतितास वेग गाठला आहे.

मलिकच्या या वेगवान चेंडूवर एखादा खेळाडू बाद होऊ शकतो असाच हा चेंडू होता. परंतु, चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळं या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे. १०व्या षटकातील हा तिसरा चेंडू होता, जो शॉर्ट चेंडू होता. यावर ऋतुराज गायकवाडने पुल शॉट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या वरच्या काठाला लागून चौकार गेला. नंतर असे दिसून आले की हा चेंडू ताशी १५४ किलोमीटर वेगाने फेकला गेला होता.

आयपीएल २०२२ च्या ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत दोन बाद २०२ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत सहा बाद १८९ धावाच करता आल्या. सनरायझर्स हैदराबादकडून निकोलस पूरनने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा केल्या. यामध्ये त्याच्या शेवटच्या षटकात तीन षटकार लगावले.


हेही वाचा – KKR Vs RR : राजस्थान आणि कोलकाता उद्या भिडणार आमनेसामने, कुठे आणि कधी होणार सामना?

First Published on: May 2, 2022 11:59 AM
Exit mobile version