स्टिमॅक भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक

स्टिमॅक भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक

Stimac

क्रोएशियाचे माजी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे. आगामी २ वर्षांसाठी स्टिमॅक यांना करारबद्ध करण्यात आले आहे. स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनात क्रोएशिया संघ २०१४ सालच्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. माजी प्रशिक्षक स्टेफन कॉन्स्टँटिन यांनी जानेवारीमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने भारतीय फुटबॉल संघ मागील चार महिने भारताचा फुटबॉल संघ प्रशिक्षकाविनाच होता. भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्टिमॅक यांचे स्वागत करताना म्हणाले, भारतीय फुटबॉलमध्ये सध्या परिवर्तनाचा काळ आहे, अनेक नवीन बदल घडत आहेत. त्यामुळे स्टिमॅक यांचा अनुभव भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल.५ जूनपासून थायलंडमध्ये सुरु होणारा किंग्ज चषक ही स्टिमॅक यांच्यासमोरचे पहिले आव्हान असणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी क्युर्सो संघाविरुद्ध असणार आहे.

अनुभवाचा होईल फायदा
इगोर स्टिमॅक यांनी लुका मॉड्रीचसारख्या खेळाडूला प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे ते भारतीय फुटबॉलमध्येही बदल घडवतील याची मला खात्री आहे. त्यांनी खूप चांगल्या खेळाडूंसोबत काम केले असल्याने त्यांच्या अनुभवाचा मला आणि संघातील सर्वच खेळाडूंना फायदा होईल, असे भारताचा फुटबॉलपटू संदेश झिंगन म्हणाला.

First Published on: May 16, 2019 4:08 AM
Exit mobile version