Ind Vs Sa : मयांक अग्रवालच्या खेळावर सुनील गावस्करांची नाराजी, भारतीय खेळाडूंना दिला सल्ला

Ind Vs Sa : मयांक अग्रवालच्या खेळावर सुनील गावस्करांची नाराजी, भारतीय खेळाडूंना दिला सल्ला

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू आहे. भारताची सलामी जोडी जोहान्सबर्गच्या कसोटीनंतर पुन्हा एकदा केपटाऊनमध्ये फोल ठरली आहे. भारतीय संघाचा वेगवान फलंदाज मयांक अग्रवालने कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतकीय खेळी केल्यानंतर इतर डावांमध्ये त्याला फारच संघर्ष करावा लागला आहे. केपटाऊनच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अग्रवालने केवळ १५ धावा काढल्या होत्या. तसेच त्याची विकेट कगिसो रबाडाने घेतली होती.

मयांक अग्रवालने रबाडाच्या आऊट स्विंग बॉलवर शॉर्ट मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मयांकच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केलीय.

खराब खेळपट्टीमुळे गमावली विकेट

भारताचे माजी ओपनर सुनील गावस्कर यांनी मयांक अग्रवालच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गावस्कर म्हणाले की, स्विंग होणाऱ्या बॉलवर फलंदाजी करण्यासाठी भारताच्या सलामीवारीला अनेक अडचणींची सामना करावा लागतोय. कारण मिडल बॉलवर खेळपट्टी करणारा मयांक अग्रवाल हा उत्तम खेळाडू आहे. परंतु तो वेगळा शॉर्ट मारण्यासाठी गेल्यामुळे त्यांची दांडी उडाली.

टी-२० फॉरमॅटचा दोष

सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात मयांक अग्रवालने अर्धशतक केलं. त्यानंतर पुढील चौथ्या डावात त्यांने ६८ धावा केल्या. सुनील गावस्करांनी भारतीय गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंवर कडाडून टीका केली आहे. गावस्कर यांनी संपूर्णपणे टी-२० फॉरमॅटचा दोष असल्याचं सांगितलं आहे. तुम्हाला एका फॉरमॅटनुसार भागिदारी करावी लागते. खेळण्यासाठी मानसिक संतुलन फार महत्त्वाचं आहे. भारतीय संघासाठी केपटाऊन कसोटी खराब ठरली आहे. कारण मयांक अग्रवालने १५ धावा केल्या. तर केएल राहुलने १२ धावा करत पॅव्हेलियनमध्ये माघारी परतले.


हेही वाचा : Explosion in Kabul: काबूलमध्ये तालिबानच्या सरकारी सैनिकांवर बॉम्बहल्ला, ९ जण जखमी


 

First Published on: January 12, 2022 6:14 PM
Exit mobile version