बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सौरव गांगुली पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष राहू शकतात. तर पुढील तीन वर्षांसाठी जय शाह बीसीसीआयचे सचिव राहतील. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सौरव गांगुली आणि जय शाह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बीसीसीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद केला. यामध्ये सध्याच्या घटनेत कूलिंग ऑफ पीरियडची तरतूद आहे. एक पदाधिकाऱ्याचा 12 वर्षांपर्यंत कार्यकाळ असू शकतो. ज्यामध्ये राज्य संघटनेत सहा वर्षे आणि बीसीसीआयमध्ये सहा वर्षांचा समावेश असतो. परंतु त्यानंतर त्याला तीन वर्षांच्या ब्रेकवर जावे लागू शकते.

खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, एक पदाधिकारी बीसीसीआय आणि राज्य असोसिएशन या दोन्ही स्तरांवर एका विशिष्ट पदावर सलग दोन वेळा कार्यकाळासाठी काम करू शकतो. त्यानंतर त्याला तीन वर्षांचा ब्रेक घ्यावा लागतो. अध्यक्ष गांगुली आणि सचिव शाह यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाशी संबंधित घटनेत सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या बोर्डाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला. ज्यात सर्व राज्य क्रिकेट संघटना आणि बीसीसीआयमधील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील अनिवार्य ब्रेक रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

बीसीसीआयने आपल्या प्रस्तावित दुरुस्तीमध्ये, आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी ब्रेक घेण्याच्या कालावधीसंदर्भात मागणी केली होती. जेणेकरून गांगुली आणि शाह संबंधित राज्य क्रिकेट संघटनांमध्ये सहा वर्षे पूर्ण करूनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून पदावर राहतील. यापूर्वी, न्यायमूर्ती आरएम लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बीसीसीआयमध्ये बदल
आणि सुधारणांची शिफारस केली होती, जी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली होती.


हेही वाचा : धावांचा पाऊस पाडणारा विराट ‘सोशल’मध्येही आघाडीवर


 

First Published on: September 14, 2022 7:21 PM
Exit mobile version