T20 WC AUS VS PAK : बाय बाय पाकिस्तान, पराभवानंतर पाकिस्तान सोशल मीडियावर ट्रोल

T20 WC AUS VS PAK : बाय बाय पाकिस्तान, पराभवानंतर पाकिस्तान सोशल मीडियावर ट्रोल

टी-२० विश्वचषकात गुरूवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मॅथ्यू वेडला दिलेल्या जीवनदानाच्या बदल्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. शाहीन शाह आफ्रिदीच्या सलग ३ चेंडूवर षटकार मारून ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडून त्याला जीवनदान दिले होते आणि त्यानेच पाकिस्तानला हरवण्यात मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानचा हास्यास्पद पराभव झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. विश्वचषकात एकही पराभवाचा सामना न करता उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाकिस्तानचा असा पराभव झाल्याने पाकिस्तानला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

पाकिस्तानने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केला होता. त्यानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवास ७ नोव्हेंबरला झालेल्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या सामन्यावर अवलंबून होता. मात्र त्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले सोबतच भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आले. न्यूझीलंडचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाल्यानंतर पाकिस्तानकडून क्रिकेट पाकिस्तान नावाच्या ट्विटर अकांउटवरून एक ट्विट करण्यात आले होते. “बाय बाय इंडिया, पुढच्या वर्षी भेटुया’ असे त्या ट्विटमध्ये म्हटले होते.

पाकिस्तानने केलेले ट्विट खूप व्हायरल झाले होते. पाकिस्तानी संघ सतत चांगले प्रदर्शन करत आल्याने त्यांचे कौतुकही होत होते. पण दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा हास्यास्पद पराभव झाल्याने भारतीयांनी पाकिस्तानच्या जुन्या ट्वि़टला व्हायरल करत पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली. पाकिस्तानने दिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने १९ षटकांतच पूर्ण केला. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान विरूध्द त्यांनी केलेल्या पहिल्या ट्वि़टला उद्देशून अनेक टिका टिप्पणी केली जात आहे. तर बाय बाय पाकिस्तान, हे काय झालं, चला आता रस्ता मोजूया, हसन अलीचे आभार, कराची विमानतळावर स्वागत आहे, असे मेम्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


हे ही वाचा:भारत २०३१ मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप आयोजित करण्याची शक्यता, जाणून घ्या कधी होणार World Cup?


 

First Published on: November 12, 2021 1:15 PM
Exit mobile version