पावसामुळे भारत-न्यूझीलंडचा सराव सामना रद्द; आता थेट पाकिस्तानशी लढत

पावसामुळे भारत-न्यूझीलंडचा सराव सामना रद्द; आता थेट पाकिस्तानशी लढत

टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली असून, भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघ सराव सामने खेळत आहे. या सराव सामन्यातील कालचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाला. त्यामुळे आता भारतीय संघाची थेट पाकिस्तानशी लढत होणार आहे. परिणामी टी-20 विश्वचषकाचा पहिलाचा सामना पाकिस्तानशी होणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचा वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. (t20 world cup 2022 warm up match has been called off due to rain india vs new zealand practice match)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडयमवर खेळला जाणारा सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना बुधवारी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार होता. तसेच, सामन्याच्या अर्ध्या तासापूर्वी या सामन्यासाठी नाणेफेक होणार होती. मात्र, पावसामुळे नाणेफेकीलाही उशीर झाला.

अखेर भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली. पावसामुळे भारत-न्यूझीलंड यांच्यातील 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ टाइम जाहीर केला होता. जो स्थानिक वेळेनुसार रात्री 8:46 (भारतीय वेळेनुसार दुपारी 4.16) होता. तसेच पाऊस थांबल्यास हा सामना 5-5 षटकांचा खेळवला जाईल, अशीही माहिती बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सराव सामना रद्द झाल्यानंतर भारत टी-20 विश्वचषकातील पहिला सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. मागच्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्यात पराभवाला समारे जावा लागले होते. त्यामुळे रविवारच्या सामन्यात भारतीय संघ या पराभवाचा बदला घेणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – भारत-पाकिस्तान क्रिकेट युद्ध; जय शाहांच्या वक्तव्यानंतर ‘पीसीबी’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

First Published on: October 19, 2022 4:01 PM
Exit mobile version