विराट कोहली टॉसमध्ये सर्वात अन’लकी’ कर्णधार; रेकॉर्ड बघा..

विराट कोहली टॉसमध्ये  सर्वात अन’लकी’ कर्णधार; रेकॉर्ड बघा..

टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीगाठण्यासाठी भारतीय संघाला आपल्या प्रत्येक सामन्यात मोठ्या धावसंख्येच्या विजयाची गरज आहे. अफगाणिनस्ताचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाला शुक्रवारी होणाऱ्या स्कॉटलंड विरूध्दच्या सामन्यात देखील विजय मिळवणे गरजेचे आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानचा मोठ्या धावसंख्येच्या फरकाने पराभव केला होता. साहजिकच संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र त्यासोबतच विराट कोहली आणि नाणेफेक यात होत असलेली ‘काटे की टक्कर’ याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात कर्णधार कोहलीने नाणेफेक न जिंकल्यामुळे संघाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. यावरून विराट कोहली आणि नाणेफेक यामधील ३६ चा आकडा समोर आला आहे. यावरच क्रिकेटचे समालोचक आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी विराटच्या आणि नाणेफेकीमधील ‘का रे दुरावा’ याबद्दल सांगितले आहे.

एका युट्यूब चॅनेल्ससोबत संवाद साधताना आकाश चोप्रा यांनी आज होणाऱ्या स्कॉटलंडविरूध्द भारताच्या सामन्याबाबतची रणनीती कशी असावी यावर त्यांनी काही मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की नाणेफेक जिंकणे प्रत्येक संघासाठी महत्त्वाचे असते. पण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि नाणेफेक यामध्ये ३६ चा आकडा असल्याचे मागील काही वर्षातील आकडेवारी सांगते. यावर आणखी स्पष्टीकरण देताना ही आकडेवारी मागील ५० वर्षातील सर्वात खराब आकडेवारी असल्याचे म्हटले आहे.

नाणेफेकीबाबत बोलताना त्यांनी अजून सांगितले की, कोहली आणि नाणेफेक यामध्ये सतत संघर्ष पहायला मिळाला आहे. कोहलीने ८ टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी फक्त एकाच सामन्यात कोहलीला नाणेफेक जिंकता आली आहे. त्याच्या क्रिकेटच्या जीवनावर नजर टाकली तर गेल्या ५० वर्षात ज्या खेळाडूंनी किमान १०० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यात कोहलीचा नाणेफेक जिंकण्याचा सर्वात वाईट विक्रम आहे. असे आकाश चोप्रा यांनी सांगितले.


 

First Published on: November 5, 2021 4:44 PM
Exit mobile version