टिम इंडियाची लष्करी टोपी पाकचा जळफळाट

टिम इंडियाची लष्करी टोपी पाकचा जळफळाट

भारत आणि ऑस्टेलियामध्ये सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रांची येथे झालेल्या तीसऱ्या सामन्यात भारतीय संघाने हिरव्या रंगाच्या टोप्या घालून मैदानात उतरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाकिस्तानने आयसीसीकडे केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आयसीसीकडे याबाबत तक्रार केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आता खेळातही राजकारण आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झालेला आहे असे दिसतय. आयसीसीने भारतीय संघावर स्वतः जातीने लक्ष घालावे. पाकिस्तानने याबाबतीत लक्ष घालण्याऐवजी आयसीसीनेच लक्षघालून भारतावर कारवाई करावी असे पाकिस्तानने म्हटले आहे. याबाबत पाकिस्तानी मिडियाशी बोलताना परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

जवानांना आदरांजली

काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भारतीय संघाने रांची मधील सामन्यात हिरव्या लष्करी टोप्या घालत मैदानावर उतरुन आदरांजली वाहिली. या सामन्यातील खेळाडूंचे संपूर्ण मानधन राष्ट्रीय सुरक्षा निधीला देण्यात आले. तसेच काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने जाहीर केल्या नुसार भारतीय संघ आगामी विश्वचषकात पाकिस्तानेमध्ये अडकून नंतर भारतात परतलेल्या अभिनंदन वर्थमान याच्या नावाचे टिशर्ट परिधान करणार आहे.

काय म्हणाले पाकिस्तानी मंत्री ?

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांच्या नंतर माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी देखील यावर आपले मत मांडले आहे. भारतीय संघाच्या वागणूकीला वेळीच आळा घाला, हे क्रिकेटनाही असे ते म्हणाले आहेत. त्याच बरोबर भारत काश्मीर वादवर भारत काश्मीरींवर करत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ काळ्या फित लावून खेळू म्हणजे हा सगळा प्रकार जगासमोर येईल अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या प्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाशी बोलून कायदेशीर तक्रार करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले

यावर प्रतिक्रिया मागीतली असता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माझी कर्णधार इंझमाम उल हकने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी एक क्रिकेटर आहे, मला राजकारणात पडायचे नसल्याचे त्याने सांगीतले. क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टींना वेगळे ठेवा असे त्याने सांगीतले.

First Published on: March 10, 2019 5:47 PM
Exit mobile version