घरमहाराष्ट्रपुलवामावर राजकारण करणार नाही

पुलवामावर राजकारण करणार नाही

Subscribe

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सुरुवातीला जनभावना लक्षात घेऊन पुलवामा हल्ल्यावर सगळ्यांनीच मौन बाळगले. पण कालांतराने या हल्ल्यावर आणि काश्मीरमधल्या स्थितीवर आता दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपण या हल्ल्याबाबत राजकारण न करण्यास बांधिल असल्याची भूमिका रविवारी (ता.24) अलिबागमध्ये जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे रविवारी अलिबागमध्ये जिल्हा परिषदेच्या राजमाता जिजाऊ 2019 पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पवार यांना विचारणा केल्यानंतर, त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

- Advertisement -

पुलवामा हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राजकीय पक्षांची बैठक लावली होती. या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख हजर होते. मात्र या बैठकीत पंतप्रधानांसह भाजपचे प्रमुख नेते हजर नव्हते. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. भाजपाचे मंत्री हजर असले तरी ते सरकारी प्रतिनिधी म्हणून होते. या बैठकीत ठराव करुन सर्वानुमते हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर याचं राजकारण न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मी याला बांधिल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या हल्ल्यानंतर काश्मीरच्या सर्वसामान्य लोकांना विश्वास देण्याची गरज आहे. यातून वाद वाढतील, असे व्यक्तव्य होऊ नये. काश्मीरमधील काही घटक यात असल्याचे सांगितले जात होते. ते भारतीय आहेत. बाहेरच्यांची मदत घेऊन कोणीकाही करत असल्यास त्या तरुणांना चुकीच्या मार्गावरुन बाहेर आणले पाहिजे, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -