ठाणे महापौर चषक स्पर्धा आजपासून

ठाणे महापौर चषक स्पर्धा आजपासून

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष-महिला निमंत्रित खो-खो स्पर्धा आज गुरुवारपासून सुरू होत असून रविवार 26 जानेवारीपर्यंत पार पडणार आहे. सदर स्पर्धा स्वामी विवेकानंद नगर मैदान, जुनी म्हाडा वसाहत, वसंत विहार, ठाणे (प.) येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी 6:00 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री, एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडणार असून यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत पुरूषांचे 16 तर महिलांचे 14 संघ सहभागी होत असून सुरूवातीला साखळी व नंतर बाद पध्दतीने सामने होणार आहेत. दोन्ही विभागात 4-4 गट केले आहेत.

पुरुष गट:

अ गट: शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमी, ओम समर्थ भारत व्या. मंदिर (सर्व मुंबई), दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, शिवभक्ती क्रीडा मंडळ, धुळे

ब गट: हिंद केसरी स्पोर्ट्स क्लब , कवठे पिरान, ग्रिफिन जिमखान, श्री. सह्याद्री संघ, सातपुडा क्रीडा मंडळ, नंदूरबार

क गट: विहंग क्रीडा मंडळ, राणा प्रताप क्रीडा मंडळ, अर्ध नारी नटेश्वर , सोलापूर, यंगस्टार, पालघर

ड गट: सरस्वती स्पोर्ट्स क्लब, प्रबोधन क्रीडा भवन, लोटस स्पोर्ट्स क्लब, सांगली, आनंद भरती समाज

महिला गट:

अ गट: रा. फ. नाईक विद्यालय, साखरवाडी संघ, सातारा, वॉरीअर स्पोर्ट्स क्लब, नेर्ले, सांगली.

ब गट: शिवभक्त विद्यामंदिर, ईगल्स, पुणे, अमर हिंद मंडळ

क गट: आर्यन स्पोर्ट्स क्लब, रत्नागिरी, पद्मावती क्रीडा मंडळ, औरंगाबाद, शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमी, वायुदुत क्रीडा मंडळ.

ड गट: नरसिंह क्रीडा मंडळ, पुणे, छत्रपती व्यायाम प्रशासक मंडळ, उस्मानाबाद, शिवनेरी सेवा मंडळ, मुंबई, दत्तसेवा क्रीडा मंडळ.

First Published on: January 23, 2020 2:08 AM
Exit mobile version