National sports award :नीरज चोप्रा, मितालीसह ११ खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार

National sports award :नीरज चोप्रा, मितालीसह ११ खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार

खेलरत्न पुरस्कारासाठी आणि अर्जुन पुरस्कारासाठीच्या नावांची यादी जाहीर झाली आहे. या वेळेस ११ खेळाडूंना खेलरत्न आणि ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार घोषित झाला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारात यावेळेस एकूण ११ खेळाडूंचा समावेश केला आहे, यात टोकियो ऑलिम्पिंक २०२० मध्ये सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा, रौप्य पदक विजेता रवी दहिया यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच क्रिकेटर मिताली राज, बॉक्सर लवलीना, पॅरालम्पिक मध्ये पदक विजेती अवनी लेखरा यांचा देखील समावेश आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, शरद कुमार, सुहास एलवाई यांच्या नावांचा समावेश आहे.

११ खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार

नीरज चोप्रा (अॅथेलेटिक्स),
रवी दहिया (रेसलिंग),
पीआर.श्रीजेश (हॉकी),
लवलीना बोरगाहेन (बॉक्सिंग),
सुनिल छत्री (फुटबॉल),
मिताली राज (क्रिकेट),
प्रमोद भगत (बॅडमिंटन),
सुमित अंतिल (अॅथेलेटिक्स),
अवनी लेखरा (शूटिंग),
कृष्णा नागर (बॅडमिंटन),
मनीष नरवाल (शूटिंग).

३५ खेळाडूंना अर्जुन अवॉर्ड

योगेश कथुरिया,
निषाद कुमार,
प्रवीण कुमार,
शरद कुमार,
सुहास एलवाई,
सिंघराज अधाना,
भाविना पटेल,
हरविंदर सिंग,
शिखर धवन,

तर पुरूष हॉकी संघातील श्रीजेशला वगळता सर्व खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. श्रीजेशचे खेलरत्न पुरस्कारासाठी नाव घोषित झाले आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंकडून शानदार प्रदर्शन पहायला मिळाले. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला एकूण ७ पदके मिळाली होती, त्यात एका सुवर्ण पदकाचा समावेश आहे. सोबतच पॅरालम्पिक मध्ये देखील भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून १९ पदके भारताला मिळवून दिली होती त्यात ५ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

First Published on: October 27, 2021 10:38 PM
Exit mobile version