टोकियो ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे होईल अशी अपेक्षा – किरण रिजिजू 

टोकियो ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे होईल अशी अपेक्षा – किरण रिजिजू 
करोना विषाणूमुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द करावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. करोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, तर या स्पर्धेच्या आयोजनाचा विचार करण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) सदस्य डिक पाऊंड म्हणाले होते. मात्र, टोकियो ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे होईल, अशी भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना अपेक्षा आहे.
करोना विषाणू चीनमध्ये आहे, टोकियोमध्ये नाही. आपण एकत्रितपणे या परिस्थितीचा सामना केला पाहिजे. टोकियो ऑलिम्पिक २४ जुलैलाच सुरु होईल आणि सुरळीत पार पडेल, अशी मला अपेक्षा आहे. जगातील प्रत्येक देशाला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे रिजिजू म्हणाले.
करोना विषाणूमुळे आतापर्यंत २००० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, जपानमध्ये १८० हून अधिक लोकांना करोना विषाणूची लागण झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाचा फटका ऑलिम्पिकला बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे होणार, असे आयोजकांनी बुधवारी सांगितले होते.
First Published on: February 27, 2020 11:10 PM
Exit mobile version