U19 World Cup 2022 : दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने; 2 फेब्रुवारीला भिडणार !

U19 World Cup 2022 : दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने; 2 फेब्रुवारीला भिडणार !

indian cricket

नवी दिल्लीः वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा अंडर 19 वर्ल्डकप हा भारतासाठी विशेष ठरणार आहे. कारण उपांत्य फेरी गाठणारा भारत हा चौथा संघ ठरलाय. भारताव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे संघही उपांत्य फेरीत पोहोचले असून, भारताने विक्रमी दहाव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलाय.

खरं तर दोन वर्षांपूर्वी बांगलादेशनेच भारताच्या 19 वर्षांखालील विश्वविजेतेपदाच्या स्वप्नाचा चक्काचूर केला होता. त्यामुळे भारतासाठी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना विशेष होता. उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा पराभव करत भारताने त्या पराभवाचा बदला घेतलाय. ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. दुसरीकडे इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तर अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.

विशेष म्हणजे 2 फेब्रुवारीला अँटिग्वा येथे दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या दोन संघांपैकी जो संघ जिंकणार आहे, त्यांचा मुकाबला अंतिम फेरीत होणार असून, अंडर 19 वर्ल्डकपचा किताब तो संघ पटकावणार आहे. पहिला सेमीफायनल सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात 1 फेब्रुवारीला होणार आहे.

कॅनडा क्रिकेट टीमचे 9 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

ICC Under 19 World Cup 2022 वर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट घोंघावत असल्याचं चित्र निर्माण झालंय. मागील काही दिवसांपूर्वी टीम इंडियातल्या अंडर-19च्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता कॅनडा क्रिकेट टीमच्या 9 खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे 9 खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर प्लेट इव्हेंटमधील 2 सामने रद्द करण्यात आले होते. कॅनडा टीममधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर कॅनडा टीमचा स्कॉटलंड विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला होता. तर दुसरा सामना युगांडा अंडर 19 आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार होता. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांसाठी ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये हे सामने रंगणार होते.


हेही वाचाः IND vs WI: युजवेंद्रची जागा घेऊ शकतो रवी बिश्नोई, दिनेश कार्तिकने सुचवला पर्याय

First Published on: January 30, 2022 8:22 PM
Exit mobile version