IPL 2022 : उमरान मलिकने मोडला स्वत:चाच विक्रम; आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू फेकला

IPL 2022 : उमरान मलिकने मोडला स्वत:चाच विक्रम; आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू फेकला

आयपीलच्या यंदाच्या पर्वात वेगवान गोलंदाजीत जम्मू काश्मिरच्या उमरान मलिकने आपली चांगलीच छाप पाडली आहे. उमरानने दिल्लीविरोधातील सामन्यात वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी केली आहे. उमरान मलिक याने या सामन्यात तब्बल 150 kmph पेक्षाही जास्त वेगानं चेंडू फेकला. उमरान मलिकने शुक्रवारी तब्बल 157 kmph च्या वेगाने चेंडू फेकला. या चेंडूसह त्याने सर्वाधिक जलद चेंडू फेकण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहचण्याचा कारनामा केला आहे.

दिल्लीविरोद्धच्या सामन्यात उमरान मलिकने वेगाचे सर्व विक्रम जवळपास मोडीत काढले आहेत. उमरान मलिक याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू फेकला. तर आयपीएल इतिहासातील हा दुसरा वेगवान चेंडू होता. आयपीएल इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या शॉन टै सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. शॉन टैचने तब्बल 157.3kmph वेगाने चेंडू टाकला होता.

आयपीएलच्या 15 व्या पर्वात सुरुवातीला उमरान मलिक याने सनरायझर्स हैदराबादच्या गेल्या 8 सामन्यात सलग आठ वेळा 150 किलोमीटर्सपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करून उमरान मलिकनं हा पुरस्कार पटकावलाय. याच वेगाच्या जोरावर उमरान मलिकनं आतापर्यंत 8 सामन्यात 12 च्या सरासरीनं तब्बल 15 विकेट्स घेतल्या आहेत. गुजरातविरुद्ध 25 धावात 5 विकेट्स ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे

उमरान मलिक याने 19 व्या षटकात 153kmph, 145kmph, 154kmph, 157kmph आणि 156 kmph च्या वेगाने गोलंदाजी केली. पण अखेरच्या चेंडूपर्यंत उमरान मलिकला विकेट घेण्यात अपयश आले. उमरान मलिकने 4 षटकात 6 वाईडसह 52 धावा खर्च दिल्या.

सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज

आयपीएलनं आजवर अनेक खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, कृणाल पंड्या, शार्दूल ठाकूर याशिवाय अलिकडेच संघात आलेले सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, टी. नटराजन हे सगळे आयपीएलनं दिलेले हिरे आहेत. याच यादीत आता उमरान मलिकचा समावेश होतो का हे पहावं लागेल.


हेही वाचा – IPL 2022 SRH vs DC: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारची उत्कृष्ट कामगिरी, इरफान पठाणच्या विक्रमाशी केली बरोबरी

First Published on: May 6, 2022 2:53 PM
Exit mobile version