बीसीसीआयकडून अनोखे ‘अभिनंदन’

बीसीसीआयकडून अनोखे ‘अभिनंदन’

अभिनंदन

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान भारतात सुखरूप परतले. अभिनंदन वर्थमान यांनी दाखवलेल्या शौर्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. शुक्रवारी रात्री सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान यांना वाघा बॉर्डरहून भारताच्या स्वाधीन केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होता. बीसीसीआयने या वीरपुत्रला अनोखी सलामी दिली आहे.

बीसीसीआयकडून शुक्रवारी भारतीय संघासाठी नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली. या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन यांचे नाव लिहिले आहे आणि जर्सीचा नंबर एक आहे. बीसीसीआयने ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘अभिनंदन तुझे मायदेशी स्वागत आहे. तू आकाशावर राज्य करतोस. त्याचप्रमाणे तू आमच्या सर्वांच्याच ह्दयावरही राज्य करतो. तुझे धैर्य आणि शौर्य येणार्‍या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.

इंडियन एअरफोर्स विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे भारतात परतले आणि सार्‍यांनी एकच जल्लोष केला. भारतात परतलेल्या या वाघाचे सार्‍यांनीच जोरदार स्वागत केले. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अन्य खेळाडूंनीही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” हिरो, हे फक्त दोन शब्द नाहीत. या दोन शब्दांपेक्षा हिरो फार मोठा असतो. हिरो तो असतो जो तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवतो.

First Published on: March 3, 2019 4:11 AM
Exit mobile version