जाफर विदर्भ संघाचा नायक

जाफर विदर्भ संघाचा नायक

वसीम जाफर

विदर्भाच्या फैज फजलच्या दुखापतीमुळे यंदाच्या विजय हजारे करंडकासाठी अनुभवी फलंदाज वसीम जाफरकडे विदर्भ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. फजल दुखापतीमधून बाहेर पडल्यानंतर तो विजय हजारे करंडकाच्या उर्वरित सामन्यांसाठी नेतृत्व करणार आहे. विदर्भ क्रिकेट संघाने या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंचा संघ निवडला आहे. तसेच रणजी करंडक स्पर्धेच्या महत्वाच्या सामन्यात भेदक गोलंदाजी करणार्‍या वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही स्थान दिले आहे.

विदर्भने सलग दुसर्‍यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले. परंतु,कर्णधार फजलला दुलीप करंडकाच्या वेळी दुखापत झाली होती. फजल संघात खेळण्याइतका तंदुरुस्त नाही. त्यामुळे आम्ही काही काळासाठी जाफरला हंगामी कर्णधार म्हणून नेमले आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत २४ सप्टेंबरला विदर्भचा संघ आपला पहिला सामना दिल्लीविरुद्ध खेळणार आहे,अशी माहिती विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद जयस्वाल यांनी दिली.

विदर्भ संघ – वसीम जाफर (कर्णधार), आर. संजय, अथर्व तायडे, गणेश सतीश, ऋषभ राठोड, अपूर्व वानखेडे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षय वाडकर, अक्षय वाखरे, अक्षय कर्णेवार, आदित्य सरवटे, उमेश यादव, यश ठाकूर, दर्शन नळकांडे आणि श्रीकांत वाघ.

First Published on: September 18, 2019 5:36 AM
Exit mobile version