विनेश फोगट राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार!

विनेश फोगट राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार!

विनेश फोगट

जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विनेश फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने आगामी सिनियर राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा जलंधरमध्ये २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. पुरुष फ्रीस्टाईल, ग्रीको-रोमन आणि महिला गटात होणार्‍या या स्पर्धेत ५०० हून अधिक कुस्तीपटू सहभागी झाले आहे.

महिला गटात विनेश (५५ किलो), साक्षी (६२ किलो) या अनुभवी खेळाडूंसह दिव्या काकरन (६८ किलो), सीमा बिस्ला (५० किलो), सरिता मोरे (५७ किलो) आणि नवज्योत कौर (६५ किलो) युवा खेळाडूंचा सहभाग असेल. या स्पर्धेत काही चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ६८ किलो वजनी गटात काकरनला पिंकी आव्हान देईल.

पुरुषांमध्ये ग्रीको-रोमन प्रकारात साजन (७७ किलो), तर फ्रीस्टाईल प्रकारात गौरव बालियान (७४ किलो), सुमित मलिक (१२५ किलो), राहुल मान (७० किलो), सत्यवर्त कडियन (९७ किलो) यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

First Published on: November 27, 2019 5:42 AM
Exit mobile version