कोहली आणि रुट सध्याचे ‘बेस्ट बॅट्समन’ – ब्रायन लारा

कोहली आणि रुट सध्याचे ‘बेस्ट बॅट्समन’ – ब्रायन लारा

सौजन्य - Scroll.in

सध्या भारताचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. सदर मालिकेत भारताला कर्णधार विराटने अप्रतिम कामगिरी केली असून याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने विराट आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटला सध्याचे सर्वोत्कृष्ठ बॅट्समन अशी उपमा दिली आहे. लारा सध्या आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफी च्या टूरवर असून त्याने हे हे वक्तव्य ‘रेडिट एएमए’ या कार्यक्रमात केले आहे. त्याचसोबत लाराने इंग्लंडचा बॉलर जेम्स अँडरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा हे सर्वोत्तम बॉलर असल्याचेही वक्तव्य केले आहे.

विराटची दौऱ्यात विराट खेळी

आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार विराटने ५४४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. विराटच्या या विराट खेळीनंतरही भारताला कसोटीत ३-१ च्या फरकाने पिछाडीवर राहाव लागलं असून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने पराभव पत्करावा लागला आहे.

विराट कोहली

बॉलर्समध्ये अँडरसन आणि रबाडा सर्वोत्कृष्ठ – ब्रायन लारा

ब्रायन लाराने बॅटिंगमध्ये कोहली आणि रूटला सर्वोत्तम सांगितले आहे तर बॉलिंगमध्ये इंग्लंडचा बॉलर जेम्स अँडरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा हे सर्वोत्तम बॉलर असल्याचे म्हटसे आहे. इंग्लंडच्या जेम्सने नुकताच भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात. लॉर्ड्सवर १०० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. तसेच त्याने भारताच्या दौऱ्यातील सर्वच मॅचमध्ये अप्रतिम बॉलिंगचे प्रदर्शन केले आहे.

मालिकेत इंग्लंड पाचव्या कसोटी आधीच विजयी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने पाचपैकी ३ सामने जिंकल्यामुळे आधीच विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने ३१ धावांनी विजय मिळवला त्या पाठोपाठ दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडने तब्बल १५९ धावांनी विजय मिळवल्यानंतर इंग्लंड मालिका जिंकतो असे वाटत असताना भारताने मालिकेत कमबॅक करत तिसरी कसोटी तब्बल २०३ धावांनी जिंकली. मात्र चौथ्या कसोटीत भारताच्या पुजारा आणि कोहली यांना वगळता कोणालाही चांगली कामगिरी करता आली नसल्याने भारताला ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इंग्लंडने मालिकेत ३-१ ची आघाडी घेतल्याने भारताच्या हातातून मालिका गेली आहे.

वाचा – भारताच्या पराभवाला अश्विनच जबाबदार – हरभजन सिंह

 

First Published on: September 6, 2018 9:29 PM
Exit mobile version