IND vs SA: विराट कोहलीकडून DRS च्या वादावर संयम सुटला, टीका करणाऱ्यांना दिलं प्रत्यूत्तर

IND vs SA: विराट कोहलीकडून DRS च्या वादावर संयम सुटला, टीका करणाऱ्यांना दिलं प्रत्यूत्तर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने डीआरएसच्या निर्णयावर आणि डीआरएस निर्णय डीन एल्गरच्या बाजूने गेल्यानंतर प्रसारकांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. बाहेर बसलेली लोकं मैदानातील अशा प्रकारच्या निर्णयांना समजू शकत नाहीत. असा पलटवार विराट कोहलीने केला आहे.

डीआरएसच्या निर्णयानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला जीवदान मिळाले होते. त्यानंतर विराट कोहलीसह आर. अश्विन आणि केएल राहुल यांनी डीआरएसच्या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्याने ब्रॉडकास्टरनाही बॉल शाईन करताना सारखा कॅमेरा टीम इंडियाच्या खेळाडूंवर का ठेवता. दक्षिण आफ्रिकेच्या संघावरही कॅमेरा ठेवत जा असे सुनावले. मात्र, विराट कोहलीने हे सर्व घडल्यानंतर स्टंप माईकमध्ये खरे खोटे देखील सुनावले.

आम्हाला माहिती आहे की मैदानावर नक्की काय घडलं?

विराट कोहलीने डीआरएसचा बद्दलचा निर्णय पाहिल्यावर त्याने सर्व खंत स्टंप माईकमध्ये बोलून दाखवली. भारतीय खेळाडूंनी देखील स्टंप माईकवर नाराजी व्यक्त केली होती. परंतु कोहलीने माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, मला यावर काहीही भाष्य करायचे नाहीये. आम्हाला माहिती आहे की, मैदानावर नक्की काय घडलं?, मैदानाबाहेर बसलेल्या लोकांना कित्येकदा माहितीही नसतं की, मैदानात नक्की काय चाल्लयं?, अशा प्रकारचा पलटवार कोहलीने टिका करणाऱ्यांवर केला आहे.

आमच्यासाठी मैदानावर जे काही घडलं त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणे आणि आम्ही भावनांच्या आहारी जाण्याचं त्यानं म्हटलंय. तसेच जर आम्ही तिथे वर्चस्व राखले असते आणि तीन विकेट घेतल्या असत्या तर त्याच क्षणी खेळाची दिशा बदलली असती, असं कोहली म्हणाला.

गौतम गंभीर भडकला…

कोहलीच्या या वागण्यावर फलंदाज गौतम गंभीर भडकला. हा विराटचा बालिशपणा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघाचे नेतृत्त्व करतोय. सामन्याचा निकाल काहीही असो परंतु एका खेळाडूने असे कृत्य करू नये, तो अनुभवी खेळाडू असल्यामुळे त्याच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही. युवा खेळाडू त्याला आदर्श मानतात, असं गौतम गंभीर म्हणाला.


हेही वाचा : उत्तर कोरियाची एका महिन्यातच तिसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी, अमेरिकन निर्बंधावर किम जोंगचे जोरदार प्रत्युत्तर


 

First Published on: January 14, 2022 10:25 PM
Exit mobile version