Virat Kohli Press Conference : कर्णधारपदाच्या वादावरून कोहली-गांगुलींमध्ये मतभेद; गांगुलींच्या दाव्यावर विराट म्हणाला…

Virat Kohli Press Conference : कर्णधारपदाच्या वादावरून कोहली-गांगुलींमध्ये मतभेद; गांगुलींच्या दाव्यावर विराट म्हणाला…

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्याने काही महत्त्वाची विधाने केली आहेत. टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यावर विराटने म्हंटले की या निर्णयावर कोणालाच काहीच अडचण नव्हती. मला कर्णधारपद सोडू नको असे सांगण्यात आले नव्हते. विराटची हि प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या त्या विधानापेक्षा बरोबर उलट आहे ज्याच्यात त्यांनी दावा केला होता की त्यांनी स्वत: विराटला कर्णधार पद न सोडण्याबाबत सांगितले होते.

दरम्यान विराटने म्हंटले की, “कर्णधार पदाच्या निर्णयाबद्दल जे काही संवाद घडले त्याबद्दल जे काही सांगितले गेले ते चुकीचे होते. ८ डिसेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी निवड बैठकीच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क साधण्यात आला आणि मी टी-२० कर्णधारपदाचा निर्णय जाहीर केल्यापासून माझ्याशी अजिबात संपर्क झाला नाही. मुख्य निवडकर्त्यांनी कसोटी संघावर चर्चा केली ज्यासाठी आम्ही दोघांनीही सहमती दर्शवली. कॉल संपण्यापूर्वी, मला सांगण्यात आले की पाच निवडकर्त्यांनी ठरवले आहे की मी एकदिवसीय संघाचा कर्णधार होणार नाही, ज्याला मी ठीक आहे असे उत्तर दिले.”

“जेव्हा मी टी-२० चे कर्णधारपद सोडले, तेव्हा मी प्रथम बीसीसीआयशी संपर्क साधला होता आणि त्यांना माझ्या निर्णयाची माहिती दिली होती आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांसमोर माझे मत देखील मांडले होते. मला टी-२० संघाचे कर्णधारपद का सोडायचे आहे, याची कारणे मी दिली आणि माझा दृष्टिकोन खूप चांगल्या पध्दतीने स्वीकारला गेला. यात कोणताही गुन्हा नाही, संकोच नाही आणि मला एकदाही सांगितले गेले नाही की तू टी-२० चे कर्णधारपद सोडू नको”. असे कोहलीने आणखी म्हंटले.

मात्र कोहलीच्या या निर्णयाला बीसीसीआयने प्रगतीशील आणि योग्य दिशेचे पाऊल म्हटले आहे. दरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी विराटने जेव्हा कर्णधारपद सोडले होते त्यावर प्रतिक्रिया दिली होती की, आम्ही विराटला टी-२० चे कर्णधार न सोडण्याबाबत सांगितले होते. त्यामुळे आता विराटच्या या विधानांमुळे गांगुली आणि विराटमधील मतभेद समोर आले आहेत.


हे ही वाचा:  http://मुंबईत जिम्नॅस्टिक स्पर्धेसह सर्व स्पर्धांची सांगता


 

First Published on: December 15, 2021 6:55 PM
Exit mobile version