विराट कोहलीच्या दुखापतीने वाढवली संघाची चिंता, एकदिवसीय मालिकेतून विश्रांती?

विराट कोहलीच्या दुखापतीने वाढवली संघाची चिंता, एकदिवसीय मालिकेतून विश्रांती?

विराट कोहलीच्या दुखापतीने वाढवली संघाची चिंता, एकदिवसीय मालिकेतून विश्रांती?

भारतीय संघाला २०२२ची सुरुवात चांगली राहिली नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांची कामगिरी खराब होती. भारताचा अष्टपैलू खेळाडू विराट कोहलीच्या पाठीत दुखत आहे. यामुळे केएल राहुलला पुन्हा एकदा कर्णधारपद सांभाळावे लागत आहे. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा नुकताच सुरु झाला असून पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली खेळण्यासाठी अनफिट झाला आहे. यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. विराट कोहलीला लवकर बरे वाटले नाही तर शेवटच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली खेळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसऱ्या कसोटीच्या नाणेफेकीवेळी केएल राहुलने सांगितले की, विराट कोहलीच्या पाठीत दुखापत झाली आहे. यामुळे कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. पंरतु तिसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली तंदुरुस्त होईल अशी संघाला आशा असल्याचे केएल राहुलने म्हटलं आहे. विराट कोहली सामन्यापूर्वी इतर खेळाडूंशी बोलताना दिसला होता. तेव्हा तो त्याच्या पाठीत दुखण्याबाबत चर्चा करत होता. विराटला यापूर्वी २०१८ मध्ये हर्निएटेड डीस्कचा त्रास झाला होता. यामुळे संघाची चिंता वाढली आहे.

विराट कोहली सध्या एकदिवसीय संघाचा सदस्य आहे. तो प्रदीर्घ काळानंतर दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र त्याची दुखापत समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिसऱ्या कसोटीसाठी विराट तंदुरुस्त होऊ शकतो. पण दुखणे वाढले तर एवढी मोठी जोखीम पत्करुन त्याची एकदिवसीय मालिक खेळणं संघाला भविष्यासाठी चिंताजनक ठरु शकते. तसेच पांढल्या चेंडूच्या फॉरमॅटचा कर्णधार रोहित शर्माही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडणे ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे केएल राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. ही एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून सुरु होणार आहे.


हेही वाचा : IND vs SA : जोहान्सबर्ग कसोटीत भारतापुढे आव्हानांचा डोंगर; आता ‘या’ गोलंदाजाला झाली दुखापत

First Published on: January 4, 2022 3:28 PM
Exit mobile version