टी20 क्रिकेटमधून विराट कोहली घेणार ब्रेक, वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती

टी20 क्रिकेटमधून विराट कोहली घेणार ब्रेक, वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी20 सामना जानेवारी महिन्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघात प्रत्येक तीन सामन्यांची टी20 आणि वनडे सीरिज खेळवली जाणार आहे. परंतु मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली आहे.

विराट कोहलीने ब्रेक घेतल्यानंतर त्याच्या जागी राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल त्रिपाठी अलीकडेच बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय संघात दाखल झाला होता. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत विराट दिसणार नाही, हे जवळपास नक्की झालं आहे. मात्र, वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

येत्या 5 जानेवारीला पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे हा सामना होणार आहे. या सामन्यासाठीच्या तिकीट विक्रीला आजपासून सुरूवात झाली आहे. 22 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 सामना पुण्यात होणार आहे. पुण्यात यापुर्वी मार्च 2021 मध्ये भारतीय संघाचे इंग्लंड संघाविरुद्ध तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.


हेही वाचा : आयपीएल 2023च्या लिलावात इंग्लिश खेळाडूंना लागली लॉटरी, जाणून घ्या सर्व खेळाडूंची यादी


 

First Published on: December 27, 2022 8:40 PM
Exit mobile version