आम्ही कोणालाही हरवू शकतो!

आम्ही कोणालाही हरवू शकतो!

SAF Football Championship

आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, असे मत काही दिवसांत सुरू होणार्‍या ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसर्‍या फेरीआधी भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार आशालता देवीने व्यक्त केले आहे. भारताच्या महिला संघाने सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले होते. हे त्यांचे सलग पाचवे जेतेपद होते. त्यामुळे पुरुष संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनेही त्यांचे कौतुक केले होते. आता महिला फुटबॉल संघाची कर्णधार आशालता देवी म्हणाली, आम्ही सॅफ स्पर्धेत खूप चांगले प्रदर्शन केले आणि आमच्या सर्व खेळाडू खूप जिद्दीने खेळल्या. आता या ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसर्‍या फेरीत आम्ही याआधीही ज्या संघांशी खेळलो आहोत त्यांच्याशी सामने होणार आहेत.

आम्ही याआधी इंडोनेशियाविरुद्ध सामना खेळलो आहोत, तसेच आम्ही म्यानमारविरुद्ध दोनदा खेळलो आहोत. त्यामुळे हे संघ कसे खेळतात याची आम्हाला कल्पना आहे. त्यांच्या संघात काय कमी आहे आणि काय ते चांगले करतात हे आम्हाला ठाऊक आहे. मला वाटते की म्यानमार हा स्पर्धेतील सर्वात चांगला संघ असणार आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असणार आहे. मात्र, मला माझ्या युवा संघावर विश्वास आहे. कारण त्यांनी याआधीही सामने जिंकले आहेत. आम्ही कोणालाही पराभूत करू शकतो असा मला विश्वास आहे आणि आम्ही म्यानमारविरुद्ध चांगली कामगिरी करू अशी मला आशा आहे.

First Published on: March 27, 2019 4:25 AM
Exit mobile version