Yoga Day 2021: १८ हजार फूट उंचावरून ITBP जवानांनी केले सूर्यनमस्कार

Yoga Day 2021:  १८ हजार फूट उंचावरून ITBP जवानांनी केले सूर्यनमस्कार

Yoga Day 2021: १८ हजार फूट उंचावरून ITBP जवानांनी केले सूर्यनमस्कार

आज सातव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त (7th internation Yoga Day) देशभरात योग दिवस साजरा करण्यात आला. राजकीय नेते, लहान मुलांपासून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत योगा दिवस साजरा करण्यात आला. हाडे गोठवणाऱ्या थंडीत तब्बल १८ हजार फूट उंचावरुन TIBPच्या जवानांनी योगा केला. सध्या त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लडाखच्या पॅगोंस त्सो सरोवराजवळ भारत तिबेट सीमेवरील जवानांनी एकत्र येत कमी तापमान असताना देखील योगा करत योग दिवस साजरा केला. अरुणाचल प्रदेशात ITBPचे जावानही चक्क घोड्यावर चढून योगा करताना दिसले. त्यांचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होता आहेत. जवानांनी लोहितपूर अँनिमल ट्रेनिंग स्कूलमध्ये एकत्र येत योगा केला. त्यातील घोड्यावर उभे राहून योगा करणाऱ्या जवानांनी सर्वांचेचे लक्ष वेधून घेतले. सध्या सोशल मीडियावरही या जवानांचे प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. (Yoga Day 2021: ITBP soldiers perform Yoga from an altitude of 18,000 feet)


तर लडाखमध्ये असणाऱ्या ITBPच्या जवानांनी १८ हजार फूट उंचावर गोठवणाऱ्या थंडीत योगा केला. या ठिकाणी मायनस डिग्री सेल्सिअस तापमानत जवान प्रचंड एकात्मतेने योगा करताना दिसले. जवानांची इच्छाशक्ती किती बळकट आहे हे जवानांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. तर दुसरीकडे लडाखच्या बर्फात उघड्याने सूर्यनमस्कार घालणाऱ्या एका ITBPच्या अधिकाऱ्यांचा देखील व्हिडिओ समोर आला आहे. हाड गोठवणाऱ्या थंडीत हा अधिकारी बिनधास्तपणे सूर्यनमस्कार घालताना दिसत आहे.

लडाख, उत्तराखंड,हिमाचल प्रदेश,सिक्किम व अरुणाचल प्रदेशमधील जवान,महिला कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांनी संयुक्त स्वरुपात योगाभ्यासत सहभाग घेतला होता. जवळपास ५० हजाराहून अधिक जवानांनी आज योगाभ्यास भाग घेतला होता. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील नागरिकांना संबोधताना योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा, घरी राहून योगा करा आणि निरोगी रहा, असे आवाहन केले आहे.


हेही वाचा – Yoga Day 2021: सातासमुद्रापार ख्याती असलेले भारतातील ७ महान योग गुरु

 

 

First Published on: June 21, 2021 3:49 PM
Exit mobile version