घरताज्या घडामोडीYoga Day 2021: सातासमुद्रापार ख्याती असलेले भारतातील ७ महान योग गुरु

Yoga Day 2021: सातासमुद्रापार ख्याती असलेले भारतातील ७ महान योग गुरु

Subscribe

आज देश विदेशातून योगा शिकण्यासाठी लोक भारतात येतात. योग गुरुंच्या कठीण परिश्रमामुळेच आज भारतात योग साधना अबाधित आहे.

आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस. कोरोना माहामारीत योग अभ्यासाने सर्वांनाच मोठी मदत केली. कोरोना महामारीत स्वत: डॉक्टरांनी देखील योगा करण्याचा सल्ला दिला. योगा विषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. भारतात योग परंपरा समृद्ध करण्यात अनेक प्रसिद्ध महान योग गुरुंचे योगदान आहे. आज देश विदेशातून योगा शिकण्यासाठी लोक भारतात येतात. योग गुरुंच्या कठीण परिश्रमामुळेच आज भारतात योग साधना अबाधित आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त जाणून घेऊया सातासमुद्रापार ख्याती असलेले भारतातील ७ महान योग गुरु.

धीरेंद्र ब्रम्हचारी

- Advertisement -

धीरेंद्र ब्रम्हचारी यांना इंदिरा गांधी यांचे योगा शिक्षक म्हणून ओळखण्यात येते. त्यांनी दूरदर्शन वाहिनीवरुन योग विद्येला चालना देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक हिंदी आणि इंग्रजी भाषेत योग साधनेवर पुस्तके लिहिली आहेत. जम्मू येथे त्यांचे आलीशान आश्रम देखील आहे.

कृष्म पट्टाभि जोइस

- Advertisement -

कृष्म पट्टाभि जोइस हे मोठे योगगुरु होते. त्यांनी अष्टांग विन्यास योग शैली विकसित केली. त्यांचा जन्म २६ जुलै १९१५ साली झाला तर मृत्यू १८ मे २००९ रोजी झाला. त्यांच्या अनुयायांपैकी मडोना,स्टिंग आणि ग्वेनेथ पाल्ट्रो यांनी नावे प्रसिद्ध आहेत.

बीकेएस अयंगर

जगभरात योग साधन पोहचवण्यात बीकेएस अयंगर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २००४ साली टाइम मॅगजीने त्यांचे नाव जगभरातील टॉप १०० प्रभावशाली लोकांमध्ये घेतले होते. ‘लाइट ऑन योगा’ या त्यांच्या पुस्तकाला योगामधील बायबल म्हणून ओळखले जाते.

परमहंस योगानंद

परमहंस योगानंद हे त्यांच्या ऑटोबायोग्राफी ‘ऑफ अ योगी’ या पुस्तकासाठी ओळखले जातात. त्यांनी पश्चिमी देशातीली लोकांना मेडिटेशन आणि क्रिया योगाचा परिचय करु दिला. परमहंस योगानंद हे योगातील पहिले आणि मुख्य गुरु मानले जातात.

तिरुमाला कृष्णमचार्य


तिरुमाला कृष्णमचार्य यांना आधुनिक योग पिता म्हटले जाते. हठयोग आणि विन्यास पुन्हा सुरु करण्याचे श्रेय यांना जाते. तिरुमाला कृष्णमचार्य यांना आयुर्वेदाविषयी देखील माहिती होती. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ते योग विद्या आणि आयुर्वेदाच्या सहाय्याने योग्य उपचार करत होते.

 

स्वामी शिवानंद सरस्वती हे पेशाने डॉक्टर होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन त्यांच्या ‘शिवानंद योग वेदांत’ या त्यांच्या योगा केंद्रात घालवले. योगासोबतच त्यांनी कर्म आणि भक्तीचा जगभरात प्रचार केला.

महर्षि महेश योगी जगभरात ट्रासेडेंटल मेडिटेशन प्रसिद्ध गुरु म्हणून ओळखले जातात. अनेक सेलिब्रेटी त्यांना गुरु मानतात.


हेही वाचा – Yoga Day 2021:कोरोना काळात योग ठरला आशेचा किरण, योग दिनानिमित्त पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -