माहीची झिवा बनली हार्दिकची ड्रायव्हर

माहीची झिवा बनली हार्दिकची ड्रायव्हर

झिवा आणि हार्दिक

टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी जितका प्रसिद्ध आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त त्याची मुलगी ‘झिवा धोणी’ प्रसिद्ध आहे. माहीचं आपल्या मुलीवर खूप प्रेम असून नेहमी तिच्याबरोबर राहाता यावं हा त्याचा प्रयत्न असतो. झिवा टीममधल्या इतर खेळांडूंचीदेखील फेव्हरेट आहे. तिच्याबरोबर नेहमीच कोणी ना कोणीतरी खेळाडू खेळताना दिसत असतो. इन्स्टावर तिचे हे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यावेळी झिवाच्या व्हायरल झालेल्या फोटोत झिवा टीम इंडियाचा हॉट फेव्हरेट ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची चक्क ड्रायव्हर झाली आहे.

झिवाच्या इन्स्टावर पोस्ट केला फोटो

नुकताच झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत छोटीशी झिवा बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर बसली असून तिच्या मागे सीटवर हार्दिक पांड्या बसला आहे. या डबलडेकर बसमध्ये झिवाच्या आणि हार्दिकच्या चेहऱ्यावरील आनंद अजिबात लपत नाही. हार्दिकदेखील झिवाबरोबर लहान होऊन हा आनंद घेताना या फोटोत दिसत आहे. झिवाचे फोटो नेहमीच इन्स्टाग्रामवर लाईक केले जातात. केवळ तीन वर्षांच्या वयात झिवा सेलिब्रिटी बनली आहे. त्यामुळं झिवाच्या नावाचं स्वतंत्र इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आलं असून यावर झिवाचे फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करण्यात येतात.

 

हार्दिकला मिळाली छोटी चिअरलीडर

हार्दिकनेदेखील झिवाबरोबर खेळण्याची ही संधी सोडलेली नाही. थोड्याच दिवसांपूर्वी आयर्लंडविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये हार्दिकसाठी झिवा चिअर करत होती. त्याचा व्हिडिओदेखील हार्दिकनं पोस्ट केला होता. ‘मला वाटतंय मला नवी चिअरलीडर मिळाली आहे.’ अशी कॅप्शन हार्दिकनं दिली होती. या व्हिडिओमध्येदेखील झिवा ‘कम ऑन हार्दिक’ अशी चीअर करत असल्याचं ऐकायला मिळत आहे.

First Published on: July 5, 2018 6:12 PM
Exit mobile version