इन्स्टाग्रामचं नवं ‘सेन्सिटिव्ह स्क्रीन’ फीचर

इन्स्टाग्रामचं नवं ‘सेन्सिटिव्ह स्क्रीन’ फीचर

इन्स्टाग्रामचं नवं 'सेन्सिटिव्ह स्क्रीन' फीचर

इन्स्टाग्राम हे तरुणाईचं आवडतं सोशल मीडिया माध्यम आहे. जगभरातील करोडो लोक आपले फोटोग्राफ तसेच व्हिडिओ शेअर करण्यासाठी इन्स्टाग्रामचा नियमीत वापर करत असतात. तर दुसरीकडे इन्स्टाग्रामही आपल्या युजर्ससना आकर्षित करण्यासाठी नेहमीच काही ना काही नवीन फीचर्स आणि सुविधा देत असतात. याच धर्तीवर इन्स्टाग्रामने त्यांच्या युजर्सकरता एक नवं फीचर लॉंच केलं आहे. ‘सेन्सिटिव्ह स्क्रीन’ असं या फीचरचं नाव आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो. व्हिडिओ, थंबनेल्स क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहे. मात्र युजरने क्लिक केल्यानंतर मात्र ते स्पष्टपणे दिसणार आहे.

यासाठी इन्स्टाग्रामने आणले नवीन फीचर

वोग डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर आहे. इन्स्टाग्रामवर अनेकदा अश्लील फोटो, सर्च, रिकमेंड किंवा सर्च केल्यानंतर अचानक अश्लील फोटो किंवा व्हिडिओ नजरेसमोर येतो. मात्र अल्पवयीन मुला – मुलींना यापासून अलिप्त राहता यावे यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार असल्याची माहिती इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.

एका तरुणीने केली होती आत्महत्या

ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्याने या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांनी केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर तरुण वर्ग देखील मोठ्या संख्येने असतो. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी हव्या त्या उपाययोजना कराव्यात, असा आदेश इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी सोशल मीडिया कंपन्यांना दिला होता. त्यानंतर इन्स्टाग्रामने हा निर्णय घेतला आहे.


वाचा – लवकरच इन्स्टावरही एक तासाचा व्हिडिओ करता येणार अपलोड

वाचा – कपिल शर्माच्या मेहंदीचे फोटो इन्स्टाग्रामवर


 

First Published on: February 8, 2019 11:18 AM
Exit mobile version