घरमुंबईमॉडेलचे इन्स्टाग्राम हॅक; १ लाखाच्या खंडणीची मागणी

मॉडेलचे इन्स्टाग्राम हॅक; १ लाखाच्या खंडणीची मागणी

Subscribe

आरिषा जैनकडून पोलीस तक्रार खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची हॅकरकडून धमकी

२०११ मध्ये ‘मिस इंडियाचा’ किताब पटकवणारी मॉडेल आरिषा जैन हिचे इन्स्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर असलेली तिची खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची हॅकरकडून धमकी देण्यात आली असून हॅकरने तिच्याकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. आरिषाने या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात हॅकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरिषा जैन हिने २०११ मध्ये ‘मिस इंडिया’ किताब पटकावला होता. ती सध्या वर्सोवा येथे रहात असून मॉडेलिंग व्यवसाय करते. १५ नोव्हेंबर रोजी तिला एक ई-मेल आला. ‘आपले इंस्टाग्राम खाते येत्या २४ तासात बंद होणार असून खाते चालु ठेवण्यासाठी मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा’, असे ई-मेलमध्ये म्हटले होते.

आरिषाने मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक केले मात्र ती लिंक कोरी होती. त्यावर काहीच नव्हते. त्यानंतर तिने स्वतःचे इंस्टाग्रामचे खाते उघडण्याचा प्रयत्न केला असता, ते उघडले नाही. तिचे इन्स्टाग्राम खाते कोणीतरी हॅककेल्याचे तिच्या लक्षात आले. हॅकरने तिच्या मिळत्या जुळत्या नावाने नवीन खाते तयार करून त्याच्यावरून आरिषाचे खाजगी छायाचित्रे आणि व्हिडिओ टाकले होते. अज्ञात हॅकरने आरिषाचे फेसबुक इंस्टाग्राम, स्नॅपचॅटचे खातेही हँक केले होते. दुसर्‍या दिवशी तिला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला. फेसबुक इंस्टाग्राम, स्नॅपचॅट खात्याचे पासवर्ड व माहीती पाहिजे असल्यास एक लाख रुपये द्या, अशी मागणी त्या मेसेजमध्ये करण्यात आली होती. पैसे दिले नाहीतर तिचे इंस्टाग्राम , फेसबुक, स्नॅपचॅट खात्यावरील छायाचित्रे आणि व्हिडीओ युट्युबवर अपलोड करुन तिला बदनाम करण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे एक लाख रुपयांची रक्कम पेटीएमद्वारे भरण्यास सांगून पेटीएम खाते नंबर देण्यात आला होता. तिने त्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला; मात्र फोन न लागल्यामुळे अखेर वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात हॅकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हॅकर राज्याबाहेरचा

मिस इंडिया विजेती आरिषा जैन हिचे इन्स्टाग्राम हॅक करणारा हॅकर हा खूप चलाख असून तो राज्या बाहेरचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वर्सोवा पोलीस ठाण्याचे एक पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी गठीत करण्यात आल्याचे सांगितले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -