घरटेक-वेकलवकरच इन्स्टावरही एक तासाचा व्हिडिओ करता येणार अपलोड

लवकरच इन्स्टावरही एक तासाचा व्हिडिओ करता येणार अपलोड

Subscribe

आपल्या आयुष्यातील काहीही घडामोड असो फेसबुक अथवा इन्स्टावर आपण पटकन अपलोड करत असतो. मात्र इन्स्टाच्या मुख्य फीडवर आपण कोणताही व्हिडिओ केवळ ६० सेकंद आणि इन्स्टास्टोरी असल्यास, १५ सेकंद अपलोड करू शकतो.

आपल्या आयुष्यातील काहीही घडामोड असो फेसबुक अथवा इन्स्टावर आपण पटकन अपलोड करत असतो. मात्र इन्स्टाच्या मुख्य फीडवर आपण कोणताही व्हिडिओ केवळ ६० सेकंद आणि इन्स्टास्टोरी असल्यास, १५ सेकंद अपलोड करू शकतो. पण आता युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता इन्स्टावर एक तासाचा व्हिडिओदेखील अपलोड करता येणार आहे.

अजूनही प्राथमिक चाचणी सुरु

अजूनही यासाठी प्राथमिक चाचणी सुरु आहे. सामान्यतः युजर कमीत कमी सेकंदाचा व्हिडिओ बघण्याला प्राधान्य देतो. इन्स्टाग्रामवर साधारण ८०० दशलक्ष युजर्स आहेत. त्यापैकी रोज जवळपास ३०० दशलक्ष युजर्स रोज इन्स्टास्टोरी अपलोड करतात. जी २४ तासानंतर दिसेनाशी होते. युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी ही प्रक्रिया जास्त चांगलं काम करू शकते असं डब्ल्यूएसजेने दिलेल्या अहवालानुसार सांगण्यात आलं आहे. या फीचरमुळं युट्यूबलासुद्धा इन्स्टाग्राम टक्कर देऊ शकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

इन्स्टानं आणलं युजर्ससाठी अजून एक नवं फीचर

इन्स्टाग्राम स्टोरीसाठी आता शॉपिंग फीचर आणणार आहे. यामध्ये इन्स्टावर आता शॉपिंग बॅग आयकॉनचं स्टीकर दिसणार आहे. यामध्ये अनेक ब्रँड्सचा समावेश करण्यात येणार असून आदिदास पासून लुईस विटनपर्यंत सगळे ब्रँड्स असतील. या फीचरद्वारे इन्स्टाग्रामचे युजर्स आपल्या आवडीच्या ब्रँडच्या खरेदीबाबत सांगू शकणार आहेत. तसंच स्टीकरवर टॅप करून आपल्या आवडीच्या ब्रँडविषयी माहिती मिळवू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -