१४०० रुपयेची किलोची ही माती!

१४०० रुपयेची किलोची ही माती!

सौजन्य- ABC

मंगळ ग्रहाचा अधिक अभ्यास सध्या शास्त्रज्ञ करत आहेत. लोकांचीही मंगळ ग्रहाविषयीची उत्सुकता वाढत आहे. इस्रोने देखील मंगळ ग्रहाचा अधिक अभ्यास करण्यासाठी मंगळयान मोहिम देखील पाठवली. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. आता शास्त्रज्ञांच्या हाती मंगळ ग्रहावरील अशी वस्तू लागली आहे. जिची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वस्तू मंगळग्रहावरील माती आहे. जी १४०० रुपये किलो दराने मिळणार आहे. पण ही माती मंगळावरील नाही.

कोण करणार विक्री?

युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा या मातीची विक्री करणार आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी या मातीची विक्री करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. १४०० रुपये किलो म्हटल्यावर नक्कीच आश्चर्य वाटले असेल कारण इतक्या दुरुन आणलेली माती इतकी स्वस्त कशी असेल ? असा प्रश्न पडतो. त्यामुळेच या संदर्भात अधिक माहिती घेतल्यानंतर ही माती पृथ्वीवरच तयार करण्यात आली आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या मंगळाच्या अभ्यासानुसार माती तयार करण्यात आली आहे. ही माती मंगळावर शेती करणे शक्य आहे का? यासाठी तयार करण्यात आली आहे.

वाचा- मंगळावर आढळली ‘ही’ गोष्ट

सर्वसामान्यांनाही विकत घेता येणार

महत्वाची बाब अशी की, ही माती सर्वसामान्यांना देखील खरेदी करता येणार आहे. सर्वसामान्य लोक प्रयोगासाठी ही माती विकत घेऊ शकते. अशा प्रकारच्या मातीची विक्री होणार म्हटल्यावर आतापासूनच लोकांनी याची ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३० हून अधिक लोकांनी याची ऑर्डर दिली आहे.

अशी दिसते मंगळावरील माती (सौजन्य- इंटरेस्टिंग इंजिनीअरींग)
वाचा- युरेका ! मंगळावर बर्फाच्या स्वरूपात पाणी

 

First Published on: October 2, 2018 4:43 PM
Exit mobile version