‘या’ मोबाईलवर आता नाही चालणार व्हॉटसअॅप

‘या’ मोबाईलवर आता नाही चालणार व्हॉटसअॅप

व्हॉटसअॅप

व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण काही फोनवर व्हॉटसअॅप सपोर्ट करणे बंद करणार आहे. तुम्ही वापरत असलेला हा फोन या व्हॉटसअॅप न चालणाऱ्याच्या यादीत तर नाही ना? हे आधी तपासून पाहा. कारण व्हॉटसअॅपनेच ही यादी जाहीर केली आहे. यात काही स्मार्टफोन आणि आयफोनचाही समावेश आहे.

ट्विटरवर दर ३० सेकंदाला महिलांबाबत वापरले जातात अपशब्द

 व्हॉटसअॅप नाही करणार सपोर्ट

व्हॉटसअॅपने स्वत:च ही यादी जाहीर केली असून यात स्मार्टफोन आणि आयफोनचा समावेश आहे. शिवाय असेही काही फोन आहेत ज्यामध्ये पुढील काळात व्हॉटसअॅप बंद होऊ शकते. २०२० मध्ये अँड्राईडमधील gingerbread आणि iOS7 या व्हर्जनच्या फोनमध्ये व्हॉटसअॅप बंद होणार आहे. व्हॉटसअॅपचे नवे व्हर्जन जुन्या फोनमध्ये सपोर्ट करणार नाही. त्यामुळे जर तुम्ही तुमचे फोन अपडेट केले नसेल तर फोन आताच अपडेट करुन घ्या. शिवाय काही जुन्या फोनमध्ये नवे व्हर्जन चालूच शकणार नाही.

एक वर्ष स्मार्टफोन वापरु नका आणि जिंका ‘७२ लाख’

तुमच्या फोनमध्ये हे सॉफ्टवेअर तर नाही ना?

२.३.३ अँड्रॉईडचे जुने व्हर्जन
विंडोज फोन / ८.० आणि त्यापेक्षा जुने व्हर्जन
आयफोन 3GS/ iOS 6
Nokia Symbian S60
BlackBerry 10
Nokia S40 (३१ डिसेंबर २०१८)
अँड्राईड २.३.७ आणि त्यापेक्षा जुने (१ फेब्रुवारी २०२०)
iOS 7 त्यापेक्षा जुने ( १ फेब्रुवारी २०२०)
या शिवाय अधिक माहिती तुम्हाला व्हॉटसअॅपवर मिळू शकणार आहे.

First Published on: December 31, 2018 6:16 PM
Exit mobile version