खुशखबर, सप्टेंबरमध्ये ‘या’ स्मार्टफोन्सची बरसात!

खुशखबर, सप्टेंबरमध्ये ‘या’ स्मार्टफोन्सची बरसात!

आता येतोय १६ कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन

स्मार्टफोन प्रेमींसाठी तसंच नवीन फोन विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा महिना पर्वणीचा महिना ठरणार आहे. कारण या महिन्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. या महिन्यात अॅपल आयफोनचं नवं मॉडेल लाँच करु शकतात. त्याशिवाय व्हिवो आणि शाओमी या कंपनीदेखील ग्राहकांसाठी बजेट फोन लाँच करणार आहेत. त्यामुळे एका अर्थाने ग्राहकांवर अनेक प्रिमिअम तसंच बजेट फोन्सची बरसात होणार आहे. याची सुरुवात ५ सप्टेंबर पासूनच होणार असून, यादिवशी शाओमी कंपनीच्या Redmi सिरीजमधील ३ नवीन फोन्स लाँच होणार आहे. एकंदरच सप्टेंबर महिन्यात अन्य कोणकोणत्या कंपनींचे आणि कोणते फोन्स लाँच होणार आहेत, जाणून घ्या त्याविषयीची सविस्तर माहिती :

शाओमी

चीनच्या शाओमी कंपनीची Redmi 6, Redmi 6A आणि Redmi 6 Pro ही तीन मॉडेल्स 5 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहेत. या तिनही मॉडेल्सचा एक टिझरही शाओमी कंपनीकडून लाँच करण्यात आला आहे. दरम्यान या तिनही मॉडेल्स अँड्रॉईड ८.१ ओरिओ ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतील.

Redmi 6 

५.४ इंचाचा एचडी डिस्प्ले
३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी (एक्सपांडेबल मेमरी ६४ जीबी)
१२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा ड्युएल रिअर कॅमेरा
५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

Redmi 6A

५.४ इंचाचा एचडी डिस्प्ले
२ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी
Redmi 6 सारखेच तंतोतंत कॅमेरा फिचर्स

Redmi 6 PRO

५.८४ इंचाचा एचडी डिस्प्ले
३ जीबी आणि ४ जीबी रॅम असलेली दोन स्वतंत्र मॉडेल्स उपलब्ध
४ हजार एमएएच बॅटरीची क्षमता
कॅमेरा फिचर्स तंतोतंत Redmi 6 आणि Redmi 6A प्रमाणेच
शाओमीचे Redmi 6, Redmi 6A आणि Redmi 6 Pro फोन होणार लाँच

Vivo V11 Pro

व्हिवो कंपनीचा Vivo V11 Pro हा फोन येत्या ६ सप्टेंबरला भारतात लाँच होणार आहे. मुंबईमध्ये आयोजित एका खास इव्हेंटमध्ये हा फोन लाँच केला जाईल. ठळक फीचर्स पुढीलप्रमाणे :

६.४१ इंचाचा एचडी डिस्प्ले
१२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा
२५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
३ हजार ४०० एमएएच क्षमतेची बॅटरी
अँड्रॉईडची ८.१ ओरिओ ऑपरेटिंग सिस्टीम
Vivo चा नवा V11 Pro स्मार्टफोन

iPhone XS

१२ सप्टेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता
बहुतांशी फिचर्स iPhone X सारखेच
A12 प्रोसेसर
५.८ OLED स्क्रीन
४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज
अंदाजे किंमत – ४८ हजार ते ५४ हजार रुपये

iPhone XS Plus

६.५ इंचाची OLED स्क्रीन
ड्युअल रिअर कॅमेरा
फेस आयडी सारखी फिचर्स
४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज
अंदाजे किंमत – ६८ हजार रुपये

iPhone 9/ SE

६.१ इंचाच LCD डिस्प्ले
अन्य बहुतांशी फिचर्स iPhone XS आणि iPhone XS Plus नुसारच
अंदाजे किंमत – ४१ हजार ते ४८ हजार रुपये
अॅपलचे iPhone XS, iPhone XS Plus आणि iPhone9/SE हे तीन नवे फोन्स होणार लाँच

हेही वाचा : Oppo चा ‘F9 Pro’ सेल्फी फोन, पाहा फिचर्स

                 इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अशी’ मिळवा ब्लू टिक

First Published on: September 4, 2018 10:11 AM
Exit mobile version