लोकलमधून तोल गेल्यानं ३४ वर्षीय तरुण पडला मुंब्य्राच्या खाडीत

लोकलमधून तोल गेल्यानं ३४ वर्षीय तरुण पडला मुंब्य्राच्या खाडीत

एक ३४ वर्षीय तरुण लोकलच्या दरवाजात उभा असताना तोल गेल्यान थेट मुंब्र्याच्या खाडीत पडल्याची घटना घडली आहे. सतीश तायडे असं या मुलाचं नाव असून तो बेपत्ता आहे. मध्य रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधकार्याला सुरूवात केली. परंतु, रात्रीची वेळ आणि भरतीची वेळ असल्यामुळं पोलिसांनी शोधकार्य थांबवलं

३४ वर्षीय सतीश तायडे हा दिव्यातील रहिवाशी आहे. शुक्रवारी रात्री १ वाजताच्या सुमारास सतीश हा आपल्या आईला घेऊन घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जात होता. त्यावेळी रुग्णालयात जाण्यासाठी लोकलनं प्रवास केला. प्रवासादरम्यान सतीश हा लोकलच्या दरवाजात उभा होता. ही लोकल मुंब्रा खाडीवर आली. त्यावेळी दरवाजात उभा असलेल्या सतीशचा तोल गेला आणि तो थेट खाडीत पडला.

सतीश खाडीत पडल्याचं समजताचं संबंधित परिसरात एकच खळबळ माजली. त्यावेळी तातडीनं या सर्व प्रकाराची माहिती मुंब्रा पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिस कर्मचारी, रेल्वे पोलिस कर्मचारी व ठाणे अग्निशमन दलाचे जवान या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. सतीश खाडीच्या ज्या भागात पडला त्या ठिकाणी शोधकार्याला सुरूवात केली.

ही घटना रात्री १ वाजताच्या सुमारास घडल्यामुळं अंधार आणि त्यातच खाडीत भरतीची वेळ असल्यानं शोधकार्य करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळं पोलिसांच्या परवानगीनं शोधकार्य थांबविण्यात आले आहे.


हेही वाचा – ‘मॉर्निंग वॉक प्लाझा’ला पहिल्याच दिवशी ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद

First Published on: April 1, 2022 3:21 PM
Exit mobile version