घरठाणे'मॉर्निंग वॉक प्लाझा'ला पहिल्याच दिवशी ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद

‘मॉर्निंग वॉक प्लाझा’ला पहिल्याच दिवशी ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद

Subscribe

ठाणे महानगरपालिका, ठाणे वाहतूक विभाग व ठाणे पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ठाणे शहरातील उपवन परिसर, बिरसा मुंडा चौक ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, तीन हात नाका येथील सर्व्हिस रोड या ठिकाणी पहिल्या टप्प्‌यातील "मॉर्निंग वॉक ट्रॅक" तयार करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पोस्ट कोव्हिडनंतरच्या काळात सकाळच्या वेळेत व्यायाम व मॉर्निंग वॉक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला असून नागरिकांना सुरक्षितपणे व्यायाम व चालता यावे यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून शुक्रवारपासून (१ एप्रिल, २०२२) ठाण्यातील महापौर निवासस्थान ते पायलादेवी मंदिर चौक, वीर बिरसा मुंडा चौक ते डॉ. काशिनाथ नाट्यगृह आणि धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार ते वाहतूक पोलीस ऑफिस या ठिकाणी येत्या ”मॉर्निंग वॉक प्लाझा” सुरू करण्यात आले आहेत. या मॉर्निग वॉक प्लाझाला ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून आज सकाळी आयुक्तांनी या ठिकाणी पाहणी केली.

ठाणे महानगरपालिका, ठाणे वाहतूक विभाग व ठाणे पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ठाणे शहरातील उपवन परिसर, बिरसा मुंडा चौक ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, तीन हात नाका येथील सर्व्हिस रोड या ठिकाणी पहिल्या टप्प्‌यातील “मॉर्निंग वॉक ट्रॅक” तयार करण्यात आले आहे. सकाळी ५ ३० ते ८.०० या वेळेत या ठिकाणी नागरिकांनी मॉर्निंग वॉक करता येणार आहे. तसंच यावेळेत या ठिकाणी कोणतीही वाहतूक राहणार नाही, या वेळात वाहतूक विभागाशी समन्वय साधून या ठिकाणाची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नमूद केले.

- Advertisement -

यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, सर्व कार्यकारी अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

“पहिल्याच दिवशी तिन्ही ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणच्या परिसरात सुरू असलेली सौंदर्यीकरणाची कामे पूर्ण करावीत असे आदेश आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच या तीन ठिकाणी सुरू केलेल्या नागरिकांचा प्रतिसाद पाहून शहरातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने मॉर्निंग वॉक प्लाझा तयार करण्यात येणार आहे.”, असं ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितलं.

- Advertisement -

“सध्यस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉर्निंग वॉक महत्चाचा विषय आहे. याचा मूळ उद्देश आहे की नागरिकांना व्यायाम करताना व्हेईकल फ्री झोन मिळणे हा आहे. तसेच मॉर्निंग वॉकच्या वेळी अनेकदा सोनसाखळी चोरण्याचे प्रकार घडतात, या मॉर्निंग वॉक प्लाझामुळे आता नागरिकांना रस्ते मोकळे मिळणार आहेत. नागरिकांना सुरक्षित ट्रॅक उपलब्ध होण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे”, असं ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.


हेही वाचा – माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातमीचे मुख्यमंत्र्यांकडून खंडन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -