…तर दहीहंडी, गणेशोत्सव सण साजरे झाले नसते, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

…तर दहीहंडी, गणेशोत्सव सण साजरे झाले नसते, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Eknath Shinde Targeted to Uddhav Thackeray |ठाणे – उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातून एकमेकांवर तुफान फटकेबाजी केली. येत्या काही दिवसांत ठाण्यातील राजकीय नेत्यांची आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे, असं काल उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील भाषणात म्हटलं. तर, एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. आमचं सरकार आलं म्हणून दहीहंडी, गणेशोत्सव साजरा करता आला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“आमचं सरकार आलं नसत तर सगळं बंद असतं कारण चायनामध्ये कोरोना आला आहे. गोविंदा, गणपती पण झाले नसते. पण, आमचं सरकार आलं म्हणून असे कार्यक्रम होतं आहेत,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं तुफान भाषण, आरोग्य शिबिरात बंडखोरांवर निशाणा

“राजस्थानमध्ये मला भरभरून प्रेम मिळालं. पण ठाण्यातला कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुढच्या काही काळात बदलेलं ठाणे दिसेल. टप्याटप्याने सर्व काम पूर्ण होतील. भारतातून लोकं ठाणे बघायला येतील असं त्यांनी सांगितले. तसेच, तुमचे आमदार निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामे गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहेत, मला वाटतं इतर कुठल्याच मतदारसंघात तेवढी कामे झालेले नाहीत. गुवाहाटीला असताना सगळ्या कागदपत्रांवर सह्या करत होतो. सर्वात जास्त निधी प्रताप सरनाईक यांनाच मिळाला आहे,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडून षटकार

राजकारणात जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा आलेला आहे तो समोर दिसत असताना देखील शिवेसना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही याचा मला अभिमान आहे. अन्यायाला लाथ मारायची असं बाळासाहेबांनी शिकवलं आहे. त्यांचीच शिकवण आहे की ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण करायचं. या ८० टक्के समाजसेवेला राजन यांनी सुरुवात केली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी ठाकरे काल ठाणे दौऱ्यावर होते.

First Published on: January 27, 2023 8:36 AM
Exit mobile version