दिवा-ठाणे रेल्वेमार्गावर मोठा अपघात टळला

दिवा-ठाणे रेल्वेमार्गावर मोठा अपघात टळला

बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता दिवा ठाणे मार्गावर एका मालागडीचे कपलिंग तुटल्याने डबे वेगवेगळे झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना घडल्यानंतर ही सुदैवाने मोठा अपघात टळला. यानंतर वेळीच घडलेल्या प्रकाराची दखल घेत अर्ध्या तासाच्या आत सर्व डबे जोडून गाडी पुन्हा मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

दिवा ठाणे मार्गावर एका मालगाडीचा नववा आणि दहावा डबा कपलिंग तुटल्याने वेगळा झाला, असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना घडल्यानंतर काही क्षणात याबाबत पायलटला माहिती मिळाली. त्यानुसार गाडी कंट्रोल करून त्यांनी थांबवण्यात आली. यानंतर पाठोपाठ कपलिंग तुटल्याने वेगवेगळे झालेले डबे देखील जागीच थांबले. पण या घटनेमुळे रेल्वेचा जलद मार्ग विस्कळीत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मालगाडीच्या मागे चार लोकल अडकल्या होत्या, परंतु पाच वाजल्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली. त्यानंतर हळुहळु लोकल सेवा पूर्ववत झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आले.


आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार? – राणे

First Published on: August 25, 2021 7:28 PM
Exit mobile version