घरताज्या घडामोडीआयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार? - राणे

आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार? – राणे

Subscribe

जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मांडली विविध मुद्द्यांवर भूमिका, मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेला केले लक्ष्य

ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार, असा सवाल करत नारायण राणे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं. मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळीच्या कार्यक्रमात जे शब्द उच्चारले तो कोणता सुसंस्कृतपणा होता. पवारसाहेब, अशा व्यक्तीला आपण मुख्यमंत्री केलं आपण, अशा शब्दांत राणेंनी पत्रकार परिषदेत आपला संताप व्यक्त केला.

गेले काही दिवस दौरा जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना सगळी माहिती मला मिळत होती. काही लोक चांगुलपणाचा फायदा उचलतात, हेही लक्षात आलंय. त्यावर लगेच काही बोलणार नाही. मात्र, ही यात्रा पंतप्रधान मोदींना पंतप्रधान म्हणून ७ वर्षे झाली. त्यांनी केलेली कामे, भारताला दिलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ही यात्रा आहे.

- Advertisement -

मी असं काय बोललो. ज्याचा राग आला. प्रश्न असा आहे, भूतकाळात एखादी गोष्ट घडली, त्याची माहिती दिली. शिवसेना नेत्यांनी असे शब्द विचारले नाहीत? बीडीडी चाळीचा कार्यक्रम होता. त्यावेळी ते महाशय बोलले की, सेना भवनाबद्दल अशी कुणी भाषा करेल तर त्याचे थोबाड तोडा. हा क्राईम नाही? सांगा मला. न्यायालयातून निघाल्यानंतर पहाटे पाचला घरी पोहोचलो. हायकोर्टात शिवसेनेकडून ज्या ज्या केसेस दाखल होत्या त्यावर माझ्याबाजूने निकाल लागला. याचाच अर्थ देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालेले आहे, असेही राणे म्हणाले.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले राणे…

मुख्यमंत्र्यांनी योगींबद्दल योगी आहे का ढोंगी, चपलांनी मारलं पाहिजे, असे शब्द वापरले होते. हा त्यांचा सुसंस्कृतपणा होता का? अमित शहा यांच्याबद्दलही त्यांनी निर्लज्जपणाने हा शब्द वापरला. असंसदीय असला तरीही वापरतो. ठरलेली गोष्ट आता तुम्ही बाहेर येऊन नाकारू शकता, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे बोलले होते. माननीय पवारसाहेब, हा काय सालसपणा, सज्जनपणा आहे. असे चांगले बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केले? काय भाषा आहे? आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवले… असे बोललो.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -