महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ यांची श्रीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्या

महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ यांची श्रीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्या

ठाणे – ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस नाईक अनिता भीमराव वाव्हळ यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी महिला कक्षेत पख्याला ओढणीने गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहली नसल्याने त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज श्रीनगर पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा – ठाण्यात रंगणार थरांचा थरार, आनंद दिघेंनी सुरू केलेल्या हंडीला अडीच लाखांचे बक्षीस

अनिता वाव्हळ या २००८ साली ठाणे शहर पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. सद्यस्थितीत त्या श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या कर्तव्यावर हजर झाल्या होत्या. त्यांना दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यातील इतर महिला पोलीस कर्मचारी फोन करत होत्या. परंतु त्या फोन उचलत नव्हत्या, म्हणून त्यांनी महिला कक्षात जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता, महिला पोलीस नाईक वाव्हळ यांनी ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. प्राथमिक तपासानुसार त्यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा – नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘नौपाडा रक्षक’ अभियान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

First Published on: August 16, 2022 7:44 PM
Exit mobile version