घरठाणेनागरिकांच्या सुरक्षेसाठी 'नौपाडा रक्षक' अभियान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘नौपाडा रक्षक’ अभियान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Subscribe

ठाणे – श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, ठाणे आणि वुई आर फॉर यु या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘नौपाडा रक्षक’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली. या अभियानात ७५ सेवेकरी सहभागी होणार असून यांच्यामार्फत हे सेवेकर पोलीस मित्र बनून नौपाडा विभागात गस्त घालणार आहेत.

हेही वाचामध्यरात्री ध्वजारोहण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जपली ठाण्यातील 40 वर्षांपूर्वीची परंपरा

- Advertisement -

रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत सेवेकरी पोलीस मित्र बनून संपूर्ण नौपाडा विभागात गस्त घालणार आहेत. गस्तीदरम्यान ते विभागात देखरेख करणार आहेत. तसेच, रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवण्याचं कामंही करण्यात येणार आहे. रात्री कोणाला वैद्यकीय मदत लागल्यास हे सेवेकर तत्पर राहणार आहेत. यामुळे परिसरात सुरक्षा राखली जाणार असून नागरिकांना सुरक्षित राहता येणार आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्याचं मोदी सरकारकडून चांगभलं

- Advertisement -

सेवा हाच धर्म म्हणत किरण नाकती यांनी वुई आर फॉर युची सुरुवात केली आणि त्यांच्याच नेतृत्ववाखाली नौपाडा रक्षक हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या उद्घाटनावेळी यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश अंबुरे, नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, माजी महापौर नरेश म्हस्के व नौपाडा रक्षक सेवेकरी हजर होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -