ठाण्यात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

ठाण्यात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

ठाण्यात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

ठाण्याच्या बाजारपेठेतील प्रभात टॉकीज जवळील इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील दुकानाला मंगळवारी सकाळच्या सुमारास आग लागली. यामध्ये दोन दुकाने जळून खाक झाली असून कोणीही जखमी झालेले नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आगीत दोन दुकाने जळून खाक

ठाणे बाजारपेठेतील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये एकमेकांना खेटून आहे.त्यातील एक दुकानाला अचानक सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुकानदार दुकाने उघडण्यासाठी आल्याने हा प्रकार तात्काळ निर्दशनास आला. पण, इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने आगीने काही क्षणातच रुद्ध रूप धारण केले. या आगीची झळ बाजूच्या एका दुकानाला बसली असून यामध्ये ती दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहे. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक आणि दुसरे मोबाईलचे दुकान आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

आगीची माहिती मिळताच ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. यावेळी , एक फायर इंजिन आणि एक पाण्याचे टँकर पाचारण केले होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने ही आग लागली तेंव्हा दुकाने उघडण्याची वेळ असल्याने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी बोलताना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत गितेश इलेक्ट्रॉनिक्स, एफ एम सी मोबाईल्स ही दुकाने पुर्णपणे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. व्यापाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचा तात्काळ प्रतिसाद यामुळेच ही आग जास्त भडकली नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.


पायऱ्यांवरची प्रतिविधानसभा बंद केली, तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर कारवाई

First Published on: July 6, 2021 2:25 PM
Exit mobile version